मुंबई : पाकिस्तान टीम या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 2 कसोटी सामन्यांची मालिक खेळवण्यात आली आहे. याआधी पाकिस्तान टीम रावळपिंडी इथल्या मैदानावर सराव करत आहे. या सामन्यात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीने लाजीरवाणं कृत्य केले. ज्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सराव सामन्यात पाकिस्तानच्या हसन अलीने आपला सहखेळाडू सलमान अलीला बॉल टाकत होता. तो बॉल सलमानच्या पॅडवर लागला. त्याने आऊटसाठी अपील केलं मात्र अंपायरने आऊट केलं नाही. तो स्वत: अंपायरकडे गेला आणि त्याने अंपायरचा हात वर करून आऊट देण्याचा इशारा केला.
हसन अलीचं वागणं पाहून सगळेच हैराण झाले. त्याचं कृत्य लाजीरवाणं होतं. त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान पहिला कसोटी सामना 16 जुलै तर दुसरा कसोटी सामना 24 जुलै रोजी होणार आहे.
पाकिस्तानचं नेतृत्व बाबार आझम करत आहे. तर उपकर्णधार विकेटकीपर मोहम्मद रिझवान आहे. हसन अलीचंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. पाकिस्तान चिडीचा डाव खेळतं अशी टीकाही काही युजर्सनी केली आहे.