Team India : सध्या एशिया कप ( Asia cup ) सुरु असून टीम इंडिया श्रीलंकेमध्ये हे सामने खेळतेय. नुकतंच वनडेची आयसीसी रँकिंग ( ICC ODI RANKINGS ) जाहीर करण्यात आली होती. या रँकिंगमध्ये टीम इंडिया ( Team India ) तिसऱ्या क्रमांकावर होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान पटकावलं तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशातच टीम सध्या एशिया कपमध्ये वनडे सामने खेळवले जात असून टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याची संधी आहे. ही संधी नेमकी कशी आहे, काय आहे समीकरण पाहूया.
नुकतंच एशिया कपमध्ये टीम इंडियाने ( Team India ) सुपर-4 फेरीमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने आशिया कपच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्याना याचा आयसीसी क्रमवारीत टीम इंडियालाही फायदा झालाय
सध्याच्या स्थितीत टीम इंडिया 116 रेटिंग पॉईंट्सह तिसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान 118-118 रेटिंग पॉईंट्सह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. भारताविरुद्धच्या पराभवापूर्वी पाकिस्तान ( Ind vs Pak ) नंबर वन संघ होता. मात्र भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी नंबर वनचा ताज गमावला. अवघे 10 दिवस पाकिस्तान आयसीसी रँकिंगमध्ये ( ICC ODI RANKINGS ) पहिल्या स्थानावर होती.
एशिया कपमध्ये टीम इंडियाने ( Team India ) सलग 3 सामने जिंकलेत. त्यामुळे ते पहिल्या क्रमांकाच्या अगदी जवळ आलेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने एशिया कपच्या अंतिम फेरीपर्यंत चांगला खेळ सुरू ठेवला तर त्यांना वर्ल्डकपूर्वीच नंबर वन टीम बनण्याची संधी आहे. दुसरीकडे भारताला वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन व्हायचं असेल, तर त्यासाठी गुरुवारी होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तान टीमचा पराभव केला पाहिजे.
एशिया कपमध्ये 15 सप्टेंबर रोजी टीम इंडिया विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. यामध्ये टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध विजय मिळवावा लागेल. त्यानंतर अंतिम फेरीतही विजय मिळवावा लागेल. टीम इंडियाला नंबर वन होण्यासाठी हे पुरेसं ठरणार नाही. एशिया कप जिंकण्याबरोबरच त्यांना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सिरीजवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागणार आहे. ही सर्व समीकरणं जुळून आली तर टीम इंडिया नंबर वन होऊ शकते.
जर सर्व समीकरणे अशीच राहिली तर रोहित शर्माची टीम इंडिया ( Team India ) ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला पराभूत करून आयसीसी वनडे क्रमवारीत ( ICC ODI RANKINGS ) नंबर 1 संघ बनेल. नंबर वनचा ताज कायम ठेवण्यासाठी भारताला तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमध्येही ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागेल.