बांगलादेश विरुद्ध पराभवामुळे पाकिस्तानला धक्का, आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, भारत कितव्या स्थानी?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन्ही सामने हे रावलपिंडीमध्ये खेळवले गेले असून पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव झाला होता. 

पुजा पवार | Updated: Sep 4, 2024, 05:15 PM IST
बांगलादेश विरुद्ध पराभवामुळे पाकिस्तानला धक्का, आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, भारत कितव्या स्थानी?  title=
(Photo Credit : Social Media)

ICC Test Team Rankings : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज पार पडली. या टेस्ट सीरिजच्या दुसऱ्या सामन्यातही बांगलादेशने पाकिस्तानवर निर्विवाद विजय मिळवला. पाकिस्तानला त्यांच्याच मैदानात धूळ चारून बांगलादेशने 3-0 च्या आघाडीने ही सिरीज जिंकली. बांगलादेशकडून पहिल्यांदा टेस्ट सिरीजमध्ये पराभूत झाल्यावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पाकिस्तानची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन्ही सामने हे रावलपिंडीमध्ये खेळवले गेले असून पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव झाला होता. 

आयसीसीने आपल्या वेबसाईटवर म्हंटले की, "बांगलादेशकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये आठव्या स्थानी घसरण झाली आहे. वेबसाईटनुसार 'पाकिस्तानची टीम बांगलादेश विरुद्ध सिरीजपूर्वी सहाव्या स्थानावर होती, परंतु लागोपाठ दोन पराभव झाल्यामुळे पाकिस्तानची टीम आता वेस्ट इंडिजपेक्षाही खाली गेली आहे. पाकिस्तानकडे सध्या 76 रेटिंग पॉईंट्स असून पाकिस्तान 1965 नंतर पहिल्यांदा एवढ्या कमी रेटिंगवर पोहोचला आहे". 

हेही वाचा : सचिन .. सचिन..! महाराष्ट्राच्या सुपुत्रानं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, 40 वर्षांनी पहिल्यांदा जिंकलं पदक

बांगलादेशने सिरीज जिंकून 13 रेटिंग पॉईंट्स मिळवले असले तरीही ते रँकिंगमध्ये नवव्या स्थानी आहेत. पाकिस्तान विरुद्धची टेस्ट सिरीज 2-0 ने जिंकल्याने फायदा मिळालेला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतर बांगलादेशने आयसीसी रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी पोहोचले आहे. बांगलादेश आता भारताविरुद्ध दोन टेस्ट सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टेस्ट सामना चेन्नई येथे 19 सप्टेंबरमध्ये पार पडणार आहे. 

टेस्ट रँकिंगमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर : 

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडे 124 रेटिंग असून भारताला 120 रेटिंग आहे. तिसऱ्या स्थानावर 108 रँकिंगने इंग्लंड असून चौथ्या स्थानावर 104 रँकिंगने साऊथ आफ्रिका आहे. तर पाचव्या स्थानावर न्यूझीलंड असून त्यांचे रेटिंग्स 96 आहे.