India vs Australia 4th T20I : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Veer Narayan Singh stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्यात चर्चेत राहिलंय, ते स्टेडियम... रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर (No Electricity At Raipur's stadium) जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...
रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमने 2009 पासून 3.16 कोटी रुपयांचे इलेक्ट्रिक बिल भरलेलं नाही आहे. परिणामी, पाच वर्षांपूर्वी स्टेडियमची वीज खंडित झाल्याने फ्लडलाइट पूर्णपणे जनरेटरवर चालवावे लागणार आहेत. छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनने तात्पुरत्या कनेक्शनची विनंती केली आहे. त्यावर अजून निर्णय झाला नसल्यामुळे सामना जनरेटरच्या मदतीने चालवावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याआधी 2018 मध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना स्टेडियममध्ये वीजपुरवठा नसल्याचं लक्षात आल्यावर एकच गोंधळ झाला होता.
सध्या राज्य सरकारच्या वतीने सुरू केलेल्या तात्पुरत्या वीजेची क्षमता 200 किलोवॅट एवढी आहे, ती 1 हजार किलोवॅटपर्यंत करण्यासाठी केलेला अर्ज मंजूर झाला आहे, परंतु त्यावर अद्याप काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
No electricity at Raipur stadium hosting India Vs Australia T20 Today. The stadium has an outstanding bill of ₹ 3.16 crore, due to which the electricity connection at the stadium had been cut 5 years ago. [NDTV]#INDvsAUS pic.twitter.com/GAQAwk2rgI
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) December 1, 2023
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.