ब्रिसबेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथ्या टेस्टची घमासान सुरू आहे. सीरीज १-१ अशी बरोबरी केल्यामुळे आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या संघाला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भारतीय संघाचे अनेक खेळाडू जखमी असून सगळे खेळाडू हे युवाच आहेत. भारताचं प्रदर्शन खूप चांगलं आहे मात्र ब्रिसबेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विजयाच्या वाटेवर आहे.
गाबाचं मैदान ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप खास आहे. या संघाने मैदानावर ६३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी ४० सामन्यांवर विजय मिळवलं आहे आणि ८ सामन्यात हार स्विकारली आहे. तर याच मैदानावर १३ सामने ड्रॉ झाले तर एक सामना टाय झाला.
महत्वाचं म्हणजे या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघ भारताकडून कधीच हरलेला नाही. या मैदानावर दोन्ही संघांनी सात सामने खेळले आहेत. ज्यामधील ५ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून १ सामना ड्रॉ झाली आहे. यामुळे आताचा विजय नक्की कुणाचा आहे. याकडे चाहत्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग ३६९ वर रन्स ऑल आऊट झाली आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलर्सनी कांगारुंच्या इनिंगला खिंडार पाडले. दुसऱ्या दिवशी टीम पेन आणि कॅमेरुन ग्रीन झटपट माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाची इनिंग गडगडली आहे. टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडली. टी. नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची इनिंग रोखण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया 369वर ऑल आऊट झाला असून टीम इंडियाच्या बॉलर्सची चकमकदार कामगिरी पाहायला मिळाली.