IND vs AUS VIDEO : कोणताही खेळाडू जेव्हा आपल्या देशासाठी खेळतो तेव्हा त्याच्या मनात असणाऱ्या भावना शब्दांत मांडता येत नाही. हे तेच क्षण असतात जेव्हा खेळाडू जागतिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्वं करत असतात. त्यांची प्रत्येक कृती ही संघासाछी आणि देशासाठी समर्पित असते. अशा खेळांडूंचा सन्मान नको का व्हायला? अर्थात व्हायला पाहिजे, आणि तसं झालंयसुद्धा.
Border-Gavaskar Trophy तील दुसरा कसोटी सामना अतिशय खास आहे. निमित्त आहे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara). कारण, भारतीय संघाकडून खेळतानाचा हा त्याचा शंभरावा कसोटी सामना आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे सुरु असणाऱ्या या सामन्यात पुजाराला टीम इंडियानं एक खास भेट दिली.
पुजारानं ऑस्ट्रेलियाविरोधातच (Ind vs Aus) बंगळुरूतून 2010 मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं होतं. तिथपासून सुरु झालेला त्याचा प्रवास आज 100 व्या कसोटीपर्यंत पोहोचला असून, हा प्रवास पुढेही असाच सुरु असेल. पण, तत्पूर्वी हा मैलाचा दगड गाठल्यामुळं त्याला संघातील खेळाडूंनी मैदानात येताना Guard of Honor दिल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, हे क्षण कोणत्याही खेळाडूला भावूक करतील असेच आहेत.
A guard of honour and a warm welcome for @cheteshwar1 on his th Test #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/jZoY1mjctu
— BCCI (@BCCI) February 17, 2023
भारतीय क्रिकेट संघात 13 वर्षांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या पुजाराला त्याच्यासोबत खेळणारे सर्वच खेळाडू प्रेमानं 'चिंटू' म्हणतात. नावानं हा चिंटू असला तरीही क्रिकेटच्या मैदानात मात्र त्यानं भीमपराक्रम केले आहेत ही बाब नाकारता येणार नाही.