चेन्नई: इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताला गमवावा लागला. तर आता 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा खतरनाक वेगानं गोलंदाजी करणारा खेळाडू संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शुक्रवारी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.
इंग्लंडचा हा वेगवान गोलंदाज संघाबाहेर झाला तर भारतीय संघाला मैदानात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जेम्स अँडरसनला चेन्नईतील दुसर्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंडचा संघ व्यवस्थापन त्यांच्या खेळाडूंवर दबाव आणण्यासाठी संघातील खेळाडूंचं रोटेशन करत आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देऊ शकतो. जेम्स अँडरसनने दुसर्या कसोटी सामन्यात न खेळल्यास टीम इंडियाला दिलासा मिळेल.
पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आपल्या वेगवान गोलंदाजीनं अख्खा खेळच फिरवला. त्याच्या वेगवान चेंडूंसमोर भारतीय फलंदाज कमजोर पडले. तर अजिंक्य रहाणे, शुभमन गिलची एकाच ओव्हरमध्ये दांडी उडवत भारतीय संघासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतला माघारी धाडण्यात अँडरसन यशस्वी झाला. चौथ्या डावात त्यानं केलेली कामगिरी पाहून अँडरसन संघाबाहेर राहाणंच भारतीय संघाच्या फायद्याचं असू शकतं असाही कयास व्यक्त केला जात आहे.