IND vs ENG: इंग्लंडनं टीम इंडियाचा दारूण पराभव

इंग्लंडच्या विजयामागे जॅक लिचची मोठी कामगिरी   

Updated: Feb 9, 2021, 02:28 PM IST
IND vs ENG: इंग्लंडनं टीम इंडियाचा दारूण पराभव  title=

चेन्नई : टेस्टमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडनं टीम इंडियाचा 227 रन्सनी धुव्वा उडवला. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडिया 192 रन्सवर संपुष्टात आली. टीम इंडियातर्फे विराट कोहली आणि शुभमन गिलनं हाफ सेंच्युरी झळकावली. विराट कोहली 72 तर शुभमन गिलनं 50 रन्स केल्या. टीम इंडियाचा एकही बॅट्समन मोठी खेळी करू शकला नाही. जॅक लिचनं टीम इंडियाचे 4 बॅट्समन माघारी धाडत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.. दोन्ही टीममध्ये दुसरी टेस्ट 13 फेब्रुवारीपासून चेन्नईमध्येच रंगणार आहे. 

४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव १९२ धावांवर आटोपला. परिणामी विराटचे प्रयत्न अपूरे पडले. जॅक लीचने ४ तर जेम्स अँडरसनने ३ गडी टिपत संघाला विजय मिळवून दिला. 

इंग्लंड विरोधात चेन्नई टेस्टच्या पाचव्यादिवशी भारतील फलंदाज अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसन (James Anderson) आणि जॅक लीच (Jack Leech) यांच्यासंमोर असहाय्य दिसून आले. 

महत्त्वाचं म्हणजे तब्बल 36 वर्षांनंतर इंग्लंडने भारतीय संघाला चेन्नईच्या मैदानावर हरवलं आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 1985 साली इंग्लंडला अखेरच्या वेळी भारताविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले.