मुंबई : टेस्ट मालिकेतील पराभव विसरून टीम इंडिया आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंड विरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना पहिल्या टी-20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत रोहित शर्माला अनेक नव्या खेळाडूंना प्रवेश मिळू शकतो. परदेशात कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना असेल.
रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नाही. आता तो कमबॅक करणार आहे. त्याचबरोबर केएल राहुलच्या गैरहजेरीमुळे त्याच्यासोबत इशान किशनची सलामीला उतरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंड दौऱ्यावर शतक झळकावणाऱ्या दीपक हुडाला संधी दिली जाऊ शकते.
मिडल ऑर्डरमध्ये चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकतं. त्याचबरोबर संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकासाठी जागा मिळू शकते. संजू सॅमसनने आयर्लंड दौऱ्यावर शानदार अर्धशतक झळकावलं होतं. त्याचबरोबर दिनेश कार्तिककडे विकेटकीपरची जबाबदारी देण्यात येईल.
इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारताकडे भुवनेश्वर कुमार, हर्षल आणि उमरान मलिकसारखे गोलंदाज आहेत. त्याचबरोबर युझवेंद्र चहलकडे स्पिनची जबाबदारी असेल. भुवनेश्वर कुमारकडे टी-20 क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे, जो टीमसाठी उपयुक्त ठरू शकतो.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि हार्दिक पांड्या.