BCCI चा व्हीडिओ आणि टीम इंडियाचा कोरोना काळातील विमान प्रवास पाहा

भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या टी -२० मालिका सामन्यात भारताने 3-2 ने विजय मिळवला. या विजयामुळे विराट कोहलीची टीम खूप उत्साही आहे.

Updated: Mar 22, 2021, 08:51 PM IST
BCCI चा व्हीडिओ आणि टीम इंडियाचा कोरोना काळातील विमान प्रवास पाहा

मुंबई  : भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या टी -२० मालिका सामन्यात भारताने 3-2 ने विजय मिळवला. या विजयामुळे विराट कोहलीची टीम खूप उत्साही आहे. आता टीम इंडिया आपल्या तिसऱ्या सामन्यासाठी पुण्यात पोहोचली आहे. हे सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 23 ते 28 मार्च दरम्यान खेळले जाणार आहेत.

फ्लाइट क्रूचे सदस्य पीपीई किटमध्ये

बीसीसीआईने ट्विटरवर टीम इंडियाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अहमदाबाद ते पुणे विमान प्रवासात भारतीय क्रिकेटपटूंची विशेष काळजी घेतली जात आहे. या व्हिडिओमध्ये फ्लाइट क्रूचे सदस्य पीपीई किटमध्ये दिसत आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रात रविवारी सर्वाधिक 30 हजारावर कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने खबरदारी म्हणून अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या क्रिकेटर्सच्या सुरक्षेसाठी अनेक खबरदारीचे पावले उचलली जात आहेत.

खुल्या स्टेडियममध्येच होणार सामने

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील भारत आणि इंग्लंड विरुध्दच्या  तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यातील रिकाम्या स्टेडियममध्ये खेळली जाईल, अशी माहिती क्रिकेट असोसिएशनने  फेब्रुवारी महिन्यातच दिली होती.