Ind Vs WI: BCCI कडून 2 नव्या खेळाडूंना मोठी संधी, वेस्ट इंडिज टीमची डोकेदुखी वाढणार

IPL मध्ये चांगली कामगिरी आता BCCI ची लागली लॉटरी, 2 खेळाडूंना मिळाली मोठी संधी 

Updated: Jan 30, 2022, 09:54 PM IST
Ind Vs WI:  BCCI कडून 2 नव्या खेळाडूंना मोठी संधी, वेस्ट इंडिज टीमची डोकेदुखी वाढणार  title=

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 6 फेब्रुवारीपासून वन डे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही सीरिज जिंकण्यासाठी यावेळी टीम इंडियाला मास्टर प्लॅन तयार करायचा आहे. 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामने होणार आहेत. 

टी 20 आणि वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तर दुखापतीमुळे जखमी झालेला रोहित देखील फिट झाला आहे. तो आणि बुमराह पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहेत. बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला. संघात दोन तुफानी खेळाडूंना संधी दिली. हे खेळाडू काही बॉलमध्ये अख्खा सामना बदलवू शकतात यासाठीच ते ओळखले जातात.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघात बॅकअप म्हणून तामिळनाडूचे दोन स्टार खेळाडू शाहरुख खान आणि आर साई किशोर यांचा समावेश केला. कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे, जर एखादा खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळला तर ते दोघेही निवडीसाठी उपलब्ध असतील. 

शाहरुख खान आणि साई किशोर हे अतिशय स्फोटक खेळाडू मानले जातात आहेत. यांनी आयपीएलमध्ये देखील उत्तम कामगिरी केली आहे. शाहरुख खान आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता. शाहरुख खानने IPL 2021 मध्ये 11 सामन्यात 153 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शाहरुख खानने तामिळनाडूकडून खेळताना 39 बॉलमध्ये 79 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 च्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून विजय मिळवला. तो हुबेहूब धोनीप्रमाणे फलंदाजीसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत हा खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर फिनिशरची भूमिका बजावू शकतो. टीम इंडियासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

आर साई किशोरचा टीम इंडियात स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. तो त्याच्या फिरकीच्या जादूसाठी प्रसिद्ध आहे. या खेळाडूने आपल्या स्फोटक गोलंदाजीला अनेक फलंदाज घाबरतात. तो नेटवर टीम इंडियाच्या दिग्गज गोलंदाजांचा सराव करताना दिसणार आहे. 

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल.