IND vs ZIM Playing XI Prediction, T20 World Cup: वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 मधील टीम इंडियाचा (Team India) शेवटचा सामना उद्या होणार आहे. भारत विरूद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) असा हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडियाला सेमफायलनमध्ये (semifinal) फेरीत प्रवेश मिळणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) तो मोठे बदल करण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
टीम इंडियासाठी केएल राहुलने बांगलादेशविरुद्ध चांगला खेळ केला होता. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासोबत तो ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. ज्यावेळी हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये असतात तेव्हा टीम इंडियाची सुरुवात चांगली होते.
विराट कोहली टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसतो. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर अनेक जिंकलेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणं ठरलंय.
चौथ्या क्रमांकावर स्काय म्हणजेच सूर्यकुमार यादवला संधी मिळणार आहे. त्यानंतर हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर उतरणार आहे. तर विकेटकीपींगची जबाबदारी दिनेश कार्तिककडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) वेगवान गोलंदाज म्हणून टीममध्ये स्थान देण्यात येईल. तर मोहम्मद शमी आणि र्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांनाही टीममध्ये संधी देण्यात येईल.
टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने आतापर्यंत चांगली कामगिरी केली नाही. गोलंदाजी करताना त्याने समोरच्या टीमला खूप रन्स दिले असून त्याची गोलंदाजी टीमसाठी चिंतेचा विषय बनलीये. त्यामुळे उद्याच्या सामन्यात रोहित शर्मा त्याच्या बदली युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी मिळू शकते.
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी