Ind Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या

Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला टी-20 सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.

Updated: Feb 12, 2023, 03:18 PM IST
Ind Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या  title=

Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : महिला टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan)रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार असून तो भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. 

कर्णधार फिट तर उपकर्णधार अनफिट 

टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडली आहे. तर कर्णधार हरमनप्रीत कौरही दुखापतीतून पुनरागमन करत आहे. त्यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळालाय.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली होती. उपकर्णधार स्मृती मंधानाची बोटाची दुखापत समोर आली होती. त्यामुळे मंधाना (Smriti Mandhana) पहिल्या सामन्यातून बाहेर झाली होती. मात्र, टीम इंडियाच्या दुसऱ्या सामन्यासाठी स्मृती मानधना उपलब्ध होऊ शकते, असे संघाचे प्रशिक्षक हृषिकेश कांतीकर यांनी सांगितले आहे. 

तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet kaur) सामन्याआधी फीट झाल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. हरमनला खांद्याचा त्रास जाणवत होता, मात्र आता ती दुखापतीतून सावरली आहे. त्यामुळे ती फीट असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

कुठे पाहता येणार? 

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला टी-20 सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर आणि डिस्ने-हॉटस्टार डिजिटलवर दाखवला जाईल.

दोन्ही संघाचे प्लेईंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन : यास्तिका भाटिया, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (सी), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव, शिखा पांडे.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन : मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दार, आयेशा नसीम, ​​आलिया रियाझ, ओमेमा सोहेल, कायनात इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, नशरा संधू.