India Vs Pakistan सामन्याची शेवटची ओव्हर, असा रंगला विजयाचा थरार...

थरारक! टीम इंडियाचा 'विराट' विजय, वाचा शेवटच्या ओव्हरला काय काय घडलं...

Updated: Oct 23, 2022, 06:33 PM IST
India Vs Pakistan सामन्याची शेवटची ओव्हर, असा रंगला विजयाचा थरार...  title=

T20 World Cup 2022 India Vs Pakistan : 20 वर्ल्डकपच्या पाकिस्तान विरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं 4 गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण एक चेंडू एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव काढली आणि विजयावर मोहोर उमटवली.

पहिला बॉल - Mohammad Nawaz  विरुद्ध  Pandya-  पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्य़ाच्या नादात पांड्या बाद झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कॅच घेत पांड्याला माघारी पाठवलं. त्यामुळे भारताला 5 चेंडूत 16 धावांची गरज होती.

दुसरा बॉल - Mohammad Nawaz विरुद्ध Karthik - पांड्या बाद झाल्य़ानंतर फिनिशर दिनेश कार्तिक मैदानात आला. दुसऱ्य़ा चेंडूवर कार्तिकला फक्त 1 धाव घेता आली.

तिसरा बॉल - Mohammad Nawaz विरुद्ध Kohli - विराटला आता कमाल करेल आणि षटकार खेचेल असं वाटत असताना एका स्लो बॉलवर विराटने फटका मारला. त्यावर विराटने चित्याच्या वेगाने दोन धावा खात्य़ात जमा केल्या.

चौथा बॉल - Mohammad Nawaz विरुद्ध Kohli - आता सामन्यात 13 धावांची गरज होती. त्यावेळी विराट कोहली स्टाईकवर होता. विराटने चौथ्या चेंडूवर शानदार षटकार खेचला. त्यावेळी फुलटॉस ब़ॉल आला असल्याने अंपायर्सने नो बॉल जाहीर केला. त्य़ामुळे भारतीयांचा जीवात जीव आला.

चौथा बॉल - Mohammad Nawaz विरुद्ध Kohli -  नो बॉलनंतर विराटने पुढचा बॉल खेळला. मात्र, यावेळी गोलंदाज घाबरल्याचं दिसलं. नवाझने चौथा बॉल वाई़ड टाकला.

चौथा बॉल - Mohammad Nawaz विरुद्ध Kohli - आता टीम इंडिया सामना जिंकणार हे निश्चित झालं होतं. सामना जिंकण्यासाठी  3 चेंडूत 5 धावाची गरज होती. चौथ्या चेंडूवर विराटने आणखी तीन धावा केल्या आणि फिनिशर डीके पुन्हा स्टाईकवर आला.

पाचवा बॉल - Mohammad Nawaz विरुद्ध Karthik - आता 2 चेंडूवर 2 धावाची गरज होती. त्यामुळे आता डीके नेहमीप्रमाणे सामना संपवणार असं वाटत होतं. मात्र, नवाझचा वाईड बॉल खेळण्याचा नादात पुढे आलेला डीके झाला. आता सामन्यात नवा ट्विट्स आला होता. भारताला एका चेंडूत 2 धावांची गरज होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

अखेरचा चेंडू - Mohammad Nawaz विरुद्ध Ashwin - डीके बाद झाल्यानंतर आश्विन मैदानात आला. आता सर्वांचे श्वास रोखले गेले होते. तेवढ्यात नवाझने चूक केली आणि पुन्हा वाईड बॉल टाकला. त्यामुळे आता 1 बॉलवर 1 धाव पाहिजे होती.

अखेरचा चेंडू - Mohammad Nawaz विरुद्ध Ashwin - 1 बॉल 1 धाव पाहिजे असताना नवाझच्या चेंडूवर आश्विनने बॉल फटकावला आणि 1 धाव पुर्ण केली. त्याचबरोबर भारताने हा सामना जिंकवून विजयी सलामी दिली आहे.