भारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार

आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.

Updated: Aug 27, 2017, 12:01 PM IST
भारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार title=

कोलंबो : आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.

भारतीय संघ श्रीलंकेच्या तुलनेत बलाढ्य आहे. मात्र, दुसऱ्या वन-डेतील कामगिरी ही भारतीय फलंदाजांसाठी धोक्याची घंटा आहे. यातून सावध होत, श्रीलंकेला कमी लेखण्याची चूक भारताने टाळायला हवी. श्रीलंकेने मालिकेतील दुसऱ्या वन-डे लढतीत भारताच्या सात फलंदाजांना बाद करून विजयाची आशा निर्माण केली होती. मात्र, महेंद्रसिंह धोनी आणि भुवनेश्वरकुमारने श्रीलंकेचे विजयाचे स्वप्न काही पूर्ण होऊ दिले नाही.