पुजारा रनआऊट, भारताच्या 9 विकेट्स आणि 250 रन्स

 भारताचे 9 विकेट्सच्या बदल्यात (87.5) 250 रन्स झाले आहेत. 

Updated: Dec 6, 2018, 01:24 PM IST
पुजारा रनआऊट, भारताच्या 9 विकेट्स आणि 250 रन्स title=

एडीलेट : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट क्रिकेट सामन्यात भारताच्या 9 विकेट्स आणि 250 रन्स झाले आहेत. कांगारूंच्या भेदक माऱ्यापुढे सकाळच्या सत्रात भारताची फलंदाजी ढेपाळलेली पाहायला मिळाली. हे दोन्ही संघ ऑस्ट्रेलियाच्या मातीत 1 हजार 435 दिवसांनी खेळत आहेत. याआधी 10 जानेवारी 2015 ला दोन्ही टीम समोरासमोर आल्या होत्या. ही चार सामन्यांची सिरीज ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी जिंकली होती.  आजपासून चार सामन्यांची कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीत आज भारतानं नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुरली विजय आणि रोहित शर्मा यांचं पुनरागमन झालंय तर पृथ्वी शॉ ला दुखापतीमुळे बाहेर बसाव लागलंय. 

कांगारुंच्या भेदक माऱ्याचा सामना करणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या आऊट होण्यासोबतच पहिला डाव संपुष्टात आला. एक रन्स करुन तो रनआऊट झाला. भारताचे 9 विकेट्सच्या बदल्यात (87.5) 250 रन्स झाले आहेत. 

सलामीवीर के एल राहूल, मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली हे तिघेही आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झालेत. त्यानंतर ज्याच्यावर बॅटींगची मदार होती तो रोहित शर्माही 37 रन्सवर आऊट झाला.