भारत Vs इंग्लंड : शेवटची टेस्ट मॅच, एलिस्टर कुकसाठीही

आयोजक इंग्लंड टीमलाही ही मॅच जिंकणं महत्त्वाचं ठरेल

Updated: Sep 7, 2018, 10:23 AM IST
भारत Vs इंग्लंड : शेवटची टेस्ट मॅच, एलिस्टर कुकसाठीही   title=

लंडन : साऊथम्पटनमध्ये चौथी टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतानं ही सीरीज 1-3 अशा फरकानं गमावलीय. त्यामुळे, भारतीय क्रिकेट टीमला आपला आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी कमीत कमी ही शेवटची मॅच तरी जिंकावी, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. विश्वविजेत्या भारतीय टीमला साऊथम्पटनमध्ये 60 रन्सनं पराभवाचा सामना करावा लागलाय. चौथ्या टेस्टमध्ये दुसऱ्या डावात कॅप्टन विराट कोहली आणि अजिंक्य राहाणे सोडून इतर भारतीय बॅटसमन फ्लॉप ठरले होते. कोहलीनं सीरिजमध्ये आत्तापर्यंत 544 रन्स बनवलेत.

एलिस्टर कुकची शेवटची मॅच

उल्लेखनीय म्हणजे, आयोजक इंग्लंड टीमलाही ही मॅच जिंकणं महत्त्वाचं ठरेल... कारण, ही मॅच जिंकून ते सलामी बॅटसमन एलिस्टर कुकला शानदार गुडबाय करायची इच्छा आहे. 33 वर्षांच्या कुकच्या करिअरमधली ही शेवटची टेस्ट मॅच आहे. या मॅचनंतर कुक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. कुकच्या निवृत्तीची घोषणेनंतर पाचव्या टेस्टसाठी टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Alastair Cook
 एलिस्टर कुकची शेवटची टेस्ट मॅच

शेवटच्या टेस्टच्या काही उल्लेखनीय गोष्टी

- भारत आणि इंग्लंड दरम्यान सीरिजची पाचवी आणि शेवटची टेस्ट मॅच केनसिंगटन ओवल (लंडन) मैदानावर खेळण्यात येणार आहे

- ही टेस्ट भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल

- ही मॅच तुम्हाला सोनी सिक्स, सोनी टेन 3 आणि सोनी टेन 3 एचडी वर पाहता येईल

- मॅचची ऑनलाईन स्ट्रिमिंग सोनी लिववर होईल

अशा असतील टीम्स...

भारत : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह 

इंग्लंड : जो रूट (कॅप्टन), एलिस्टर कुक, कीटन जेनिंग्स, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, ओलिवर पोप, मोइन अली, आदिल राशिद, सॅम कुरेन, जेम्स एन्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, बेन स्टोक्स.