India vs Netherlands T20 World Cup 2022 : T20 टी वर्ल्ड कप 2022 साठी टीम इंडियाचा आज (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सशी (Netherlands) सामना होणार आहे. सिडनमध्ये टीम इंडियाला जेवण्यावरुन जी वागणूक देण्यात आली त्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती. टीम इंडियासोबत झालेल्या भेदभावानंतर आज टीम इंडिया नेदरलँड्सचा पराभव करण्यासाठी सज्ज आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) (SCG) खेळवला जाईल. पाकिस्तानला (Pakistan) पराभूत केल्यानंतर T20 World Cup मध्ये विजयाचा घोडदौड कायम राखण्यासाठी विराट टीम पूर्ण ताकदीने लढणार आहे.
झी24 तास वेबवर तुम्हाला या मॅचशी संबंधित सर्व अपडेट्स आम्ही सांगणार आहोत.भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता सुरू झाला होता. पण नेदरलँड विरुद्ध खेळला जाणारा सामना 12.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network) पाहता येईल. हॉटस्टारवर (Hotstar) तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
पाकिस्तानशी मॅच असताना जसं पावसाचं संकट कायम होतं तसंच आजच्या मॅचवरही पावसाचे काळे ढग घोंगावतायत. हवामान विभागाने सिडनीमध्ये (Sydney Weather Forecast) 80% पावसाची शक्यता वर्तवली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
विक्रमजीत सिंग, मॅक्स ऑड, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, बास डी लीड, स्कॉट एडवर्ड्स, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीकी, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकरेन, फ्रेड क्लासेन.