वेलिंग्टन : बेसिन रिजर्व मैदानावर झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. टेस्टमध्ये नंबर 1 टीम असलेल्या भारताचा 10 विकेटने पराभव झाला आहे. न्यूझीलंडच्या विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये टीम 200 चा आकडा ही गाठू शकली नाही. 2013 नंतरचा हा भारताचा सर्वात मोठा पराभव आहे.
टिम साउदीने 5 तर ट्रेंट बोल्टने 4 विकेट घेतल्या. भारतीय फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्ये ही फेल ठरले. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीम 191 रनवर ऑलआऊट झाली. न्यूझीलंडपुढे फक्त 9 रनचं टार्गेट होतं.
टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा 10 विकेटने पाचवा तर भारताच्या विरोधात तिसऱा विजय ठरला आहे. भारताचा मात्र हा 2013 नंतर सर्वात मोठा पराभव ठरला आहे. 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारताचा मोठा पराभव झाला होता.
टेस्टमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या भारतासाठी हा पराभव नक्कीच निराशाजनक ठरला आहे. 2019 मध्ये एकही टेस्ट सामना न हारणारी टीम इंडिया 2020 च्या पहिल्याच टेस्ट सीरीजमध्ये पराभूत झाली. 2 सामन्यांच्या या सीरीजमध्ये आता न्यूझीलंड 1-0 ने आघाडीवर आहे.
भारताकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 58 रन केले. याशिवाय अजिंक्य रहाणेने 29 तर ऋषभ पंतने 25 रन केले. ईशांत शर्माने आठव्या विकेटसाठी 27 रनची पार्टनरशिप केली. पृथ्वी शॉ 14, चेतेश्वर पुजारा 11, विराट कोहली 19 रनवर आऊट झाले.