India vs New Zealand One Day 1st Match: न्यूझीलंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. पहिल्या गड्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा 34 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहलीही 8 धावांवर तंबूत परतला. इशान किशन (5), सूर्यकुमार यादव (31) धावा करून बाद झाले. संघांची एक बाजू शुभमन गिलनं धरून ठेवली असताना हार्दिक पांड्या मैदानात उतरला. मात्र थर्ड अम्पायरच्या निर्णयामुळे त्याला बाद होत तंबूत परतावं लागलं. यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या बाद की नाबाद असा वाद रंगला आहे.
संघाची धावसंख्या 175 असताना सूर्यकुमार यादव 26 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. डेरिल मिशेलच्या गोलंदाजीवर मिशेच सँटनेरनं त्याचा झेल घेतला. त्यानंतर उतरलेल्या हार्दिक पांड्याने साजेशी खेळी सुरु केली. 38 चेंडूत 28 धावांवर असताना डेरिल मिशेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाची असल्याची अपील करण्यात आली. मैदानातील पंचांना हा निर्णय किचकट वाटत असल्याने त्यांनी याबाबतची दाद तिसऱ्या पंचांकडे मागितली. मात्र तिसऱ्या पंचांनी त्रिफळाचीत घोषित केल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच अनेकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. खाली दिलेला व्हिडीओ पाहून आता तुम्हीच ठरवा हार्दिक पांड्या आउट होता की नाही?
How wtf was Hardik out here ??? Don't think the ball touched the stumps here man !!..@ICC please arrange better umpires next time. #notout #HardikPandya pic.twitter.com/ynEdYAdCGU
— Vaibhav TYAGI (@Vaibhav82426044) January 18, 2023
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
न्यूझीलंड- फिन एलेन, डेवॉन कॉनव्हे, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, मिशेल ब्रासवेल, मिशेल सँटनर, हेन्री शिप्ले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर