India Vs South Africa 3rd T20: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20 सामना सुरू आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल आणि विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे. तर अर्शदीप पाठिचा त्रास होत असल्यानं या सामन्यात खेळत नसल्याचं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं. त्याऐवजी संघात श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-0 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामना जिंकत आपली प्रतिष्ठा राखण्याच्या प्रयत्नात आहे. या सामन्यात मंकडिंग करण्याची संधी दीपक चाहरला चालून आली होती. मात्र त्याने तसं केलं नाही.
दीपक चाहर संघाचं 16 षटक घेऊन मैदानात उतरला होता. पहिल्याच चेंडूवर रिली रोसॉवनं षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चाहरल नॉन स्ट्राईकला असलेल्या ट्रिस्टन स्टब्ब्सला बाद करण्याची संधी मिळाली. मात्र त्याने मंकडींग केलं नाही. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Deepak chahar trying to run out non striker Stubbs #INDvSA pic.twitter.com/zXvVOztHlj
— Latest_News_update_official (@ramvish93296061) October 4, 2022
Hey India , I thought we only doing it to England lol #INDvSA pic.twitter.com/IoHvstWsWg
— Gills (@gpricey23) October 4, 2022
Great Gesture By Deepak Chahar But It Doesn't Mean that Deepti did a wrong.#INDvSA pic.twitter.com/MxyMFAk6sh
— Maham Fatima (@Maham0fficial_2) October 4, 2022
Same energy. #IndvSA pic.twitter.com/rFyJkUXjE1
— Rajabets India (@smileandraja) October 4, 2022
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, "दीपकने तसं बाद केलं नाही, याचा अर्थ दीप्तीनं चुकीचं केलं असं होत नाही". दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "मला असं वाटतं भारत फक्त इंग्लंड संघासोबतच असं करतो."