Keshav Maharaj-Lerisha Munsamy: भारताशी खास कनेक्शन असलेल्या केशव महाराजची रोमँटिक लव्हस्टोरी

पाचव्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे केशव महाराजकडे कॅप्टन्सी आली होती. 

Updated: Jun 20, 2022, 07:34 PM IST
Keshav Maharaj-Lerisha Munsamy: भारताशी खास कनेक्शन असलेल्या केशव महाराजची रोमँटिक लव्हस्टोरी  title=

मुंबई : पाचव्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे केशव महाराजकडे कॅप्टन्सी आली होती. मात्र हा सामना पावसाअभावी रद्द झाला. आणि भारत-दक्षिण आफ्रिकेने 2-2ने मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर केशव महाराज खुप चर्चेत आला. भारताशी असलेल्या खास कनेक्शनमुळे त्याची चर्चा खुप झाली. केशवचे पूर्वज एकेकाळी भारतात राहत होते. त्यांना १८७४ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत कामासाठी आणण्यात आले होते,असी त्याची खरी कहाणी आहे. केशव रियल लाईफसह त्याची लव्ह स्टोरी देखील इंटरेंस्टींग आहे.   

केशव महाराज यांच्या पत्नीचे नाव लेरीशा मुनसामी असून त्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहेत. लारिसा मुनसामीचे फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. बॉलिवूड गाण्यांची शौकीन असलेल्या लारिसाचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

केशव आणि लेरीशा यांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही आपले नाते कुटुंब आणि जगापासून बरेच दिवस लपवून ठेवले होते. केशव महाराजसमोर त्यांच्या कुटुंबीयांना समजवण्याचे मोठे आव्हान होते.

केशवने त्याच्या आईच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त नृत्याचा कार्यक्रम ठेवला, ज्यामध्ये त्याने त्याची मैत्रीण लोरीशासोबत कथ्थक नृत्य केले. या नृत्याने केशव महाराजांची आई खूप प्रभावित झाली आणि त्यांनी या नात्याला पुढे जाण्यास परवानगी दिली.

केशव आणि लेरीशा यांचे २०१९ साली लग्न झाले, पण कोविड-१९ मुळे त्यांना लग्नासाठी जवळपास तीन वर्षे वाट पाहावी लागली. यावर्षी एप्रिल महिन्यात दोघांचे लग्न झाले. 

केशव महाराज यांनी आतापर्यंत 42 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान महाराजांनी कसोटी सामन्यात 30.67 च्या सरासरीने 150 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी, या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 25 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट आहेत. महाराजांनी कसोटी क्रिकेटमध्येही बॅटने आपली ताकद दाखवत ९५३ धावा केल्या आहेत.