भारताचा टॉस जिंकत बॅटींगचा निर्णय, विराट कोहलीला विश्रांती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शेवटची टी-२० मॅच रंगत आहे.

Updated: Feb 2, 2020, 12:40 PM IST
भारताचा टॉस जिंकत बॅटींगचा निर्णय, विराट कोहलीला विश्रांती title=

माउंट माउंगानुई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शेवटची टी-२० मॅच रंगत आहे. न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारतीय संघानं टी-२० सीरिज याआधीच जिंकल्यानं टीम इंडियाचा पारडं जड मानलं जातं आहे. तर शेवटची टी-२० जिंकून सीरिजमधील शेवट गोड करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. भारताने टॉस जिंकत आधी बॅटींगचा निर्णय़ घेतला आहे. टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. विराट कोहलीला आज विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा आज कर्णधार असणार आहे.

विलियम्सनला ही आराम

न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियम्सन देखील आजच्या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी टीम सउदीला कर्णधार करण्यात आलं आहे. दुखापतीमुळे तो मागचा सामना ही खेळू शकला नव्हता.

रोहित कर्णधार

पाचव्या टी२० मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. विराट कोहलीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. मागच्या सामन्यात रोहितला विश्रांती देण्य़ात आली होती.

भारत आणि न्यूझीलंडमधील सामने आतापर्यंत कांटे की टक्कर झाले आहेत. त्यामुळे हा सामना ही तसाच होऊ शकतो. न्यूझीलंडने चारही सामने हारले असले तरी या सामन्यात ते विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. मागील २ सामने टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकले होते.

भारतीय टीम: केएल राहुल (विकेटकीपर), संजू सॅमसन, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड टीम: मार्टिन गप्टिल, कोलिन मुनरो, टॉम ब्रूस, रॉस टेलर, टिम सीफर्ट (विकेटकीपर), मिशेल सेंटनर, स्कॉट कुग्गेलॅन, टिम साउदी (कर्णधार), ईश सोढ़ी, हामिश बेनेट, डेरिल मिशेल.