मुंबई : आधी गुडघ्यांची दुखापत त्यानंतर प्रेग्नेंट असल्याने टेनिस कोर्टपासून दूर राहिलेली दिग्गज भारतीय खेळाडू सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुडघे दुखापतीमुळे तिला बराच काळ बाहेर बसावे लागले. करिअरच्या महत्त्वाच्या स्थानी तिला हा मोठा धक्का होता. त्यातून ती बाहेर आली पण आता प्रेग्नेंसीसाठी तिला काही काळ विश्रांती घ्यावी लागतेय. यामुळे तिच्या चाहत्यांसाठी दु;ख, काळजी अशा भावना आहेत. मला २०२० टोक्यो ऑलोम्पिक खेळायचे असल्याचे तिने सांगितले आहे. महिला जोडी गटात एक्स वर्ल्ड नंबर १ सानिया ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. ऑलोम्पिक खेळाआधी टेनिस कोर्टवर परतण्याचं आश्वासन तिनं चाहत्यांना दिलंय.
आपण आता २०१८ मध्ये आहोत आणि २०२० ऑलोम्पिक खेळात मला खेळायचं असल्याचे सानियाने सांगितले. हे एक यथार्थवादी लक्ष्य असून एका वर्षाच्या आत मी बाळाला जन्म देईन असेही तिने म्हटले. मी कधीच पारंपारिक महिलांप्रमाणे राहिली नाही, मी नेहमीच वेगळ्या मार्गावर राहिली आणि याचा मला आनंद असल्याचेही ती म्हणते. 'माझ्या निर्णयाला परिवाराने नेहमी साथ दिली, मग ते हैदराबादमध्ये टेनिस खेळण्याचा निर्णय असो, विंम्बल्डनमध्ये टेनिस खेळण असो किंवा लग्नानंतर आठ वर्षांनंतर आई बनण्याच स्वप्न असो.' असे ३१ वर्षीय सानिया सांगते.
'मी आपलं आयुष्य आपल्या अटींवर जगत आलीयं. खेळ हाच माझ्या आयुष्यातील मोठा शिक्षक असल्याचे ती म्हणते. खेळानेच आम्हाला (सानिया आणि शोएब) खूप काही दिलंय. पण जे आम्ही कमावलयं त्याहून जास्त हिरावलंयही पण मैदान आणि मैदानाबाहेरचा दबाव आम्ही समजू शकतो,'असेही तिने सांगितले.