close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रं मर्दा! बजरंग पुनियाचं 'सुवर्ण'यश अभिनंदनना समर्पित

स्पर्धेत मिळालेलं पदक अभिनंदन यांच्यासाठी..... 

Updated: Mar 4, 2019, 11:20 AM IST
रं मर्दा! बजरंग पुनियाचं 'सुवर्ण'यश अभिनंदनना समर्पित

नवी दिल्ली : भारत, पाकिस्तान यादोन्ही देशांमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या वातावरणातच पाकिस्तान सैन्यदलाच्या ताब्यात असणाऱे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान भारतात परतले. भारतीय वायुदलाच्या या अधिकाऱ्याच्या परतण्याने भारतीयांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने आपल्या परिने त्यांना शुभेच्छा देत स्वागत करण्यास सुरुवात केली. यामध्ये खेळाडूही मागे राहिले नाहीत. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बल्गेरियामध्ये पार पडलेल्या डान कोलोव निकोला पेत्रोव या स्पर्धेत पटकावलेलं सुवर्णपदक विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित केलं. 

बजरंगने ट्विट करत याविषयीची माहिती देत आनंद आणि गर्वाची भावना व्यक्त केली. 'मी हे सुवर्णपदक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना समर्पित करतो. त्यांच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली. एक दिवस त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे', असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं. 

विश्चचषक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पुनियाने ६५ किलो वजनी गटात अमेरिकेच्या जॉर्डन ओलिवर याच्यावर १२- ३ या गुणसंख्येने मोठा विजय मिळवला. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक अंकांचीही कमाई केली. आपल्या कारकिर्दीतील हे यश विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित करणाऱ्या बजरंगचं क्रीडा क्षेत्रातून कौतुक करणअय़ाक येत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळालेलं पुनियाचं हे दहावं पदक आहे. याआधी त्याला २०१७ ला पॅरिसमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला होता. पण, तरीही त्याची आताही कामगिरी, त्यात मिळालेलं यश आणि हेच यश साजरा करण्याची पद्धत पाहता बजरंगची कामगिरी प्रशंसनीय ठरत आहे.