कांगारूनंतर किवींना चिरडण्यासाठी 'विराट'सेना सज्ज, पाहा न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक

पाच वनडे मॅचच्या सीरिजला २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Jan 20, 2019, 06:16 PM IST
कांगारूनंतर किवींना चिरडण्यासाठी 'विराट'सेना सज्ज, पाहा न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक title=

वेलिंग्टन : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता भारतीय टीम न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. या दौऱ्यात एकूण ५ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे. या पाच वनडे मॅचच्या सीरिजला २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिली मॅच बुधवार २३ जानेवारीला नेपीअर येथे होणार आहे. महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधांनामुळे के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांना या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. त्यांच्यावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या दोघांच्या निलंबनामुळे शुभमन गिल आणि विजय शंकर यांना संधी देण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात चांगली कामगिरी केल्याने भारतीय टीमच्या विश्वासात वाढ झाली असेल. त्यामुळे भारतीय टीमदेखील या दौऱ्यासाठी उत्सुक असणार आहे. या न्यूझीलंड दौऱ्यासाठी जस्प्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारताचे एकूण पाच वनडे सामने होणार आहेत. या वनडे सीरिजला २३ तारखेपासून सुरुवात होणार असून ३ फेब्रुवारीला शेवटची वनडे खेळवली जाईल. हे पाचही सामने सकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहेत. या सीरिजमधला दुसरा आणि तिसरा सामना माऊंट मॉनगनुई येथे खेळला जाणार आहे.

वनडे मॅचच्या तारखा :  

पहिली वनडे : बुधवार २३ जानेवारी, नेपीअर 

दुसरी वनडे: शनिवार २६ जानेवारी, माऊंट मॉनगनुई

तिसरी वनडे : सोमवार २८ जानेवारी, माऊंट मॉनगनुई 

चौथी वनडे : गुरुवार ३१ जानेवारी, हॅमिल्टन

पाचवी वनडे : रविवार ३ फेब्रुवारी, वेलिग्टंन 

टी-२० सीरिज

पहिली टी-२० : बुधवार ६ फेब्रुवारी, वेलिग्टंन, दुपारी १२.३० वाजता

दुसरी टी-२० : शुक्रवार ८ फेब्रुवारी, ऑकलंड, सकाळी ११.३० वाजता           

तिसरी टी-२० : रविवार १० फेब्रुवारी, हॅमिल्टन  दुपारी १२.३० वाजता

 

वनडे सीरिजसाठी भारतीय टीम :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहाल, रविंद्र जडेजा, भु़वनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, विजय शंकर.

टी-२० सीरिजसाठी भारतीय टीम :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहाल, भुवनेश्वर कुमार, सिद्दार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर.

 

वनडे सीरिजच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी न्युझीलंडची टीम : 

केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डो ब्रासवेल, कॉलीन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, हेन्री निकोलास, मिशेल सॅन्टेनर, इश सोधी, टिम साऊथी, रॉस टेलर