INDvsAUS: पराभवानंतर विराटने केला हा ‘बहाना’

दुस-या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ८ विकेटने मात दिली. आता ३ सामन्यांच्या टी-२० सीरिजमध्ये दोन्ही संघांची १-१ अशी स्थिती आहे.

Updated: Oct 11, 2017, 07:49 AM IST
INDvsAUS: पराभवानंतर विराटने केला हा ‘बहाना’ title=

गुवाहाटी : दुस-या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ८ विकेटने मात दिली. आता ३ सामन्यांच्या टी-२० सीरिजमध्ये दोन्ही संघांची १-१ अशी स्थिती आहे.

आतापर्यंत आपलं दमदार प्रदर्शन करणारी टीम इंडिया गुवाहाटीत झालेल्या टी-२० सामन्यात फारच कमकुवत बघायला मिळाली. सामन्याच्या सुरूवातीपासून एकापाठी एक विकेट पडण्याची मालिका शेवटपर्यंत थांबलीच नाही. यावर विराट कोहलीने स्पष्टीकरण दिलं आहे.   

विराट कोहली म्हणाला की, ‘आमची बॅटींग चांगली झाली नाही सुरूवातीला मोठी अडचण गेली. त्यांनाही अडचण गेली. जेव्हा परिस्थीती आपल्या हातात नसते तेव्हा खेळाडूला मैदानात आपलं १२० टक्के प्रदर्शन द्यायचं असतं. असे केलं तर फायदा होतो आणि टीम असं करतात’.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फचं विराट कोहलीने कौतुक केलं. याने चार ओव्हरमध्ये केवळ २१ रन्स देऊन चार विकेट घेतल्या. विराट पुढे म्हणाला की, ‘मैदानावर ओस आल्याने नियंत्रण ठेवणे कठिण होऊन बसलं होतं. आम्हाला एक टीम म्हणून सामना करायचा होता. पण कधी कधी परिस्थीती तुमच्यासोबत नसते. बॅट्समन म्हणून तुमच्यात दोन वैशिष्ट्ये असतात. तुम्हाला आधी बॅटने चांगला खेळ करायचा असतो आणि नंतर मैदानात चांगली फिल्डींग करायची असते’.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फचं विराट कोहलीने कौतुक केलं. त्याच्याबद्दल बोलताना विराट म्हणाला की, ‘रोहितला त्याने टाकलेला बॉल जबरदस्त होता. त्या बॉलची लाईन आणि लेंग्थ मस्त होती. त्याने आम्हाला विचार करायला भाग पाडलं. चांगली बॉलिंग करण्याचं पूर्ण श्रेय त्याला मिळायला हवं. आज त्याने टॉपचं प्रदर्शन केलंय’. 

आता पुढील आणि अंतिम टी-२० सामना हैदराबादमध्ये १३ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. सीरिज खिशात घालण्यासाठी आता दोन्ही संघाकडे मोठी संधी आहे. कारण दोन्ही संघांच्या नावावर आधीच १ १ सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये होणारा हा सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे.