IPL 2020: मुंबई विरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या पराभवाची 5 कारणे

कोलकात्याचा मुंबई विरुद्ध दुसऱ्या सामन्यातही पराभव

Updated: Oct 17, 2020, 09:11 AM IST
IPL 2020: मुंबई विरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या पराभवाची 5 कारणे title=
(फोटो-BCCI/IPL)

अबुधाबी : आयपीएल 2020 दरम्यान बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सने 8 विकेट राखून पराभव केला. केकेआरचा मागील दोन सामन्यात सलग दुसरा पराभव आहे. तसेच या मोसमात मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

1. खराब सुरुवात

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात खराब सुरुवात केली. केकेआरने पॉवरप्ले दरम्यान पहिल्या 6 ओव्हरमध्ये फक्त 33 धावा केल्या. ज्यामध्ये राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांच्या महत्त्वपूर्ण विकेट ही गमावल्या.

2. गिल आणि कार्तिक बाद 

शुभमन गिल आणि दिनेश कार्तिक यांची विकेट एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ 2 बॉलमध्ये गेल्यानंतर केकेआरची डाव आणखी संकटात आला. या दोन्ही फलंदाजांना मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरने बाद केले.

3. आंद्रे रसेलची बॅट शांत

जेव्हा कोलकाताला रनची गरज होती. तेव्हा संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने पुन्हा एकदा निराश केले. या सामन्यात रसेलने फक्त 12 रनवर आऊट झाला.

4. गोलंदाजीत यश नाही

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना मुंबई इंडियन्ससमोर 149 धावांचे लक्ष्य वाचवता आले नाही. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी निराशाजनक गोलंदाजी केली, त्यामुळे एमआय संघाने पॉवरप्लेमध्ये कोणतीही विकेट न गमवता 51 धावा केल्या.

5. डीकॉकला जीवन दिले

केकेआरचा सर्वात मोठा पराभव म्हणजे क्विंटन डीकॉकचा कॅच सोडणे. जेव्हा डीकॉक 24 धावांवर खेळत होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीने ख्रिस ग्रीनच्या बॉलवर त्याचा कॅच सोडला. त्यानंतर डीकॉकने 78 धावांची शानदार खेळी केली.