IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगला.      

Updated: Oct 17, 2020, 11:41 PM IST
IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय title=

शारजा: दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगला. यावेळी चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आज मैदानात उतरले. नानेफेक जिंकल्यानंतर संघात मोठा बदल झाला. पियुष चावलाऐवजी केदार जाधवला संधी देण्यात आली. चेन्नईने फलंदाची करत दिल्ली संघाला १८०  धावांचं आव्हान दिलं. मात्र दिल्लीने १८५ धावांचा विक्रम रचत ५ विकेट्स घेतले. 

शिखर धवन आणि अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीमुळे  दिल्लीने चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. धवनने यावेळी ५८ चेंडूंत १४ चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर नाबाद १०१ धावांची खेळी करत आयपीएलमध्ये पहिले शतक मिळवले.

तुषार देशपांडेने उत्तम कामगिरी बजावत चेन्नईला मोठा धक्का देत पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी पाठवलं. मात्र शेन वॉटसन आणि सॅम करन या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. चेन्नईच्या डावाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. परंतु शेवटच्या क्षणी सामन्यात दिल्ली संघाने विजय मिळवला.

यापूर्वी देखील यंदाच्या हंगामात हे दोन संघ एकमेकांच्या आमनेसामने होते. गेल्या सामन्यात विजयाचा मुकूट दिल्ली संघाने घातला होता. आता देखील दिल्ली संघाचा विजय झाला तर चेन्नई सुपर किंग्स संघाला अपयशाचा साामना करावा लागला.