IPL 2020 : जेव्हा सामन्यादरम्यानच पंचांशी धोनीचा खटका उडाला...

धोनीचं एक नवं रुप पाहायला मिळालं.   

Updated: Sep 23, 2020, 09:53 AM IST
IPL 2020 : जेव्हा सामन्यादरम्यानच पंचांशी धोनीचा खटका उडाला...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सहसा क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान अनेकदा खेळाडूंचा आवेग, उत्साह पाहायला मिळतो. पण, महेंद्रसिंह धोनी ms dhoni मात्र या साऱ्यांपासून वेगळा. शांत स्वभावासाठीच ओळखल्या जाणाऱ्या धोनीची 'कॅप्टन कूल' अशीही ओळख. पण, आयपीएलच्या नुकत्याच झालेल्या एका सामन्यामध्ये मात्र धोनीचं एक नवं रुप पाहायला मिळालं. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर माही ipl 2020 आयपीएलमधील राजस्थान विरोधातील सामन्यात काहीसा आवेगात दिसला. मुख्य म्हणजे थेट पंचांशीच त्याचा खटका उडाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी झालेल्या Rajasthan राजस्थान विरुद्ध Chennai चेन्नई या सामन्यामध्ये पंचांच्या एका निर्णयावर धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

सामन्यातील १८ व्या षटकामध्ये दीपक चहरनं फेकलेला चेंडू टॉम कुरेन याच्या जांघेवर लागला आणि चेन्नईच्या खेळाडूंनी अपील केलं. ज्यानंतर टॉम कुरेनला बाद घोषित करण्यात आलं. पंचांनी पुढं हा निर्णय थर्ड अंपायरकडे नेला. ज्यानंतर हा निर्णय बदलला गेला. टॉमला बाद घोषित केल्यानंतरही रिव्ह्यू घेण्याच्या पंचांच्या निर्णय़ावर धोनीनं थेट नाराजी व्यक्त केली आणि पंचांशी त्याचा खटका उडाला. 

 

राजस्थाननं या सामन्यामध्ये चेन्नईच्या संघापुढं २१६ धावांचं लक्ष्य उभं केलं होतं. पण, चेन्नईच्या संघाला हे आव्हान पेलता आलं नाही. सरतेशेवटी राजस्थानच्या संघानं १६ धावांनी हा सामना जिंकला.