IPL 2020 : ऑरेंज कॅप केएल राहुलकडे कायम, तर पर्पल कॅप पुन्हा रबाडाकडे

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे

Updated: Nov 3, 2020, 07:02 PM IST
IPL 2020 : ऑरेंज कॅप केएल राहुलकडे कायम, तर पर्पल कॅप पुन्हा रबाडाकडे

दुबई : आयपीएल 2020 च्या 13 व्या सीजनमध्ये आतापर्यंत 55 सामने खेळले गेले आहेत आणि तरीही किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. केएल राहुलने हंगामाच्या सुरूवातीपासूनच ऑरेंज कॅप आपल्याकडे ठेवली आहे.

दुसरीकडे पर्पल कॅप पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटलचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाकडे आली आहे. त्याने या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतले आहेत. रबाडाने मुंबई इंडियन्सचा (एमआय) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून पर्पल कॅप पुन्हा मिळवली आहे. बुमराहने 13 सामन्यात 23 विकेट घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चरने 14 सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात रबाडाने 2 विकेट घेत पुन्हा एकदा पर्पल कॅप मिळवली आहे. या दोन विकेट्समुळे रबाडाच्या आता 25 विकेट्स झाल्या आहेत.

विशेष म्हणजे या सामन्यात रबाडाने पॉवरप्लेमध्ये विकेट ड्राई पूर्ण केली. रबाडा सुरुवातीपासूनच विकेटच्या शर्यतीत आघाडीवर होता परंतु मुंबई इंडियन्सच्या बुमराहने त्याला मागे सोडले होते, परंतु आता रबाडा पुन्हा अव्वल स्थानी आला आहे.

फलंदाजांच्या यादीत राहुल अव्वल आहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात राहुलने 29 धावा केल्या आणि यासह त्याने 14 सामन्यांत 670 धावा पूर्ण केल्या आहेत. चेन्नईने पंजाबला नऊ गडी राखून पराभूत केले. दोन्ही संघ आयपीएलमधून बाहेर झाले आहेत.

राहुलच्या पाठोपाठ दिल्ली कॅपिटलचा शिखर धवन याचा नंबर लागतो. त्याने 14 सामन्यात 525 रन केले आहेत. तिसर्‍या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूता देवदत्त पडिक्कल आहे. त्याने 14 सामन्यांत 472 धावा केल्या आहेत.

पंजाबचं आव्हान संपुष्टात आल्याने शिखर धवनकडे पर्पल कॅप मिळवण्याची संधी आहे. तर बुमराहकडे देखील पर्पल कॅप पुन्हा मिळवण्याची संधी आहे.