दुबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने सोमवारी दिल्ली कॅपिटलकडून 6 विकेटने पराभव पत्करला. पण तरी देखील आयपीएल 2020 च्या प्ले ऑफमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो तिसरा संघ ठरला आहे. आरसीबीला आता प्लेऑफमध्ये खेळायचे आहे, परंतु त्याआधी इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉनने विराटच्या संघाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
मायकेल वॉन म्हणाला की, 'विराट कोहलीसाठी पुढचे तीन सामने जिकणं कठीण आहे. आयपीएल 2020 चे विजेतेपद पटकावण्याची ताकद आरसीबीमध्ये नाही.' आरसीबीने एकदा देखील आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही आणि ते प्रथमच विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. आयपीएलच्या 13 व्या सत्रात आरसीबीने सुरुवातीला काही सामने जिंकले. पण नंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मायकेल वॉन म्हणाला की, मी सुरुवातीपासूनच असे म्हणतो आहे की त्यांच्याकडे यावेळी जिंकण्याची पुरेशी क्षमता आहे असे मला वाटत नाही. २०२० मध्ये काहीही घडू शकते. काय घडेल हे कोणालाही ठाऊक नसते.'
मायकेल वॉनला असे वाटते की, आरसीबीमध्ये अनुभवी खेळाडूंचा अभाव आहे. आरसीबीने 14 लीग सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत, परंतु बहुतेक सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. हा संघ पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून केकेआरला हरवून प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.