IPL 2020 : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेटने विजय

आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद 5 गडी राखून विजय

Updated: Oct 31, 2020, 11:30 PM IST
IPL 2020 : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेटने विजय
(फोटो-BCCI/IPL)

शारजाह : आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह सनरायझर्स अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे.

हैदराबाद संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीचा शानदार खेळ दाखवून खेळ जिंकला. बंगळुरूच्या 121 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्सने 14.1 ओव्हरमध्ये 121-5 धावा करून लक्ष्य गाठले. हैदराबादकडून ऋद्धिमान साहाने सर्वाधिक 39 धावा केल्या.

या स्पर्धेत आव्हाण कायम राखण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकायचाच होता. सनरायझर्सने आरसीबीचा 5 गडी राखून पराभव केला.

सनरायझर्सचा अनुभवी खेळाडू केन विल्यमसन 8 धावांवर आऊट झाला. या सामन्यात हैदराबादच्या ऋद्धिमान साहाने शानदार 39 रन केले. मनीष पांडेने 26 धावा केल्या. पहिली विकेट लवकर गमवल्यानंतर हैदराबाद संघाने पॉवरप्लेमध्ये 58-1 अशी धावसंख्या उभारली.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर केवळ 8 धावांवर वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर आऊट झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवत 120 धावा केल्या.

वॉशिंग्टन सुंदरने आरसीबीसाठी 21 धावांची मौल्यवान खेळी केली. 32 धावांची खेळी साकारल्यानंतर बंगळुरूच्या जोस फिलिपला रशीद खानने आऊट केले. जीवदान मिळाल्यानंतर ही एबी डिव्हिलियर्स 24 धावांवर शहबाज नदीमच्या बॉलवर आऊट झाला.

या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली देखील काही खास करु शकला नाही. 7 धावांवर तो संदीप शर्माच्या बॉलवर आऊट झाला.