Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माला कोलकाताविरुद्ध हे 4 रेकॉर्ड करण्याची संधी

 मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोलकाता विरुद्धच्या सामन्यात (KKR) 4 विक्रम करण्याची संधी आहे.

Updated: Sep 23, 2021, 07:22 PM IST
Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माला कोलकाताविरुद्ध हे 4 रेकॉर्ड करण्याची संधी  title=

यूएई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामातील 34 व्या सामना (IPL 2021 34th Match)  मुंबई (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता (KKR) यांच्यात खेळवण्यात येत आहे. कोलकाताने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) 4 विक्रम करण्याची संधी आहे. (IPL 2021 34th Match mi vs kkr Mumbai Indians Captain hitman rohit sharma Have oppurtunity To Makes 4 Records) 

रोहितने या सामन्यात 18 धावा केल्यास त्याच्या कोलकाता विरुद्ध 1 हजार रन्स पूर्ण होतील. यासह रोहित आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध 1हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरेल. रोहितने कोलकाता विरुद्ध आतापर्यंत 49.10 च्या सरासरीने आणि 133.06 च्या स्ट्राईक रेटने 982 धावा केल्या आहेत. 

400 सिक्स

याशिवाय रोहितला सिक्सचा अनोखा रेकॉर्ड करण्याची नामी संधी आहे. रोहितला टी 20 क्रिकेटमध्ये 400 सिक्सचा टप्पा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. रोहितने आतापर्यंत 350 टी 20 सामन्यात 397 सिक्स लगावले आहेत. आता रोहित 400च्या आकड्यापासून फक्त 3 सिक्स दूर आहे. त्यामुळे रोहित 3 सिक्स लगावत भन्नाट  कामगिरी करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

पावरप्लेमध्ये सिक्सची हाफ सेंच्युरी

रोहितने मुंबईकडून पावर प्लेमध्ये 48 सिक्स लगावले आहेत. रोहितला या 50 सिक्सच्या आकड्यासाठी 2 सिक्सची गरज आहे. तसेच रोहितला केकेआर विरुद्ध चौकाराचं शतक पूर्ण करण्याचीही संधी आहे. रोहितने कोलकाता विरुद्ध आतापर्यंत 96 चौकार ठोकलेत. त्यामुळे रोहित या अनोख्या शतकापासून 4 फोर लांब आहे.  

5500 धावा 

रोहितला आयपीएलमधील 5500 धावा करण्याची संधी आहे. रोहितला या टप्प्यासाठी फक्त 20 धावांची गरज आहे. रोहितने आतापर्यंत आयपीएलच्या 207 सामन्यात 5 हजार 480 धावा केल्या आहेत. यात रोहितने 1 शतक आणि 40 अर्धशतक लगावले आहेत. 

रोहितला हे सर्व रेकॉर्ड करण्यासाठी दणकेदार खेळीची गरज आहे. मुंबईचा या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात रोहितला खेळता आले नव्हते. त्यामुळे मुंबई या सामन्यात कमबॅक करण्याचा विचाराने मैदानात उतरणार आहे. यामुळे रोहितकडून मुंबईच्या पलटणला चांगल्या आणि दमदार बॅटिंगची अपेक्षा असणार आहे.