IPL 2021 final, CSK vs KKR: आज मैदानावर उतरताच CSK रचनार नवा रेकॉर्ड

टी-20 सामन्यांमध्ये कर्णधार असताना धोनीचा हा एकूण 300 वा सामना असेल.

Updated: Oct 15, 2021, 02:19 PM IST
IPL 2021 final, CSK vs KKR: आज मैदानावर उतरताच CSK रचनार नवा रेकॉर्ड title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले असले तरीही तो आयपीएलमध्ये CSK चा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने यावर्षी 9 व्या वेळी आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. यासह, धोनीच्या नावावर असा विक्रम झाला आहे, ज्याभोवती मोठे क्रिकेटपटूही पोहोचू शकले नाहीत.

सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज टी-20 क्रिकेटमधील आपले एक त्रिशतक पूर्ण करेल. वास्तविक, टी-20 सामन्यांमध्ये कर्णधार असताना धोनीचा हा एकूण 300 वा सामना असेल. जगातील कोणताही कर्णधार आजपर्यंत हे करू शकलेला नाही. या प्रकरणात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 208 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. धोनी आणि सॅमी मधील फरक पाहिला तर जवळपास 100 सामन्यांचा आहे.

जर आपण या प्रकरणात भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल बोललो तर तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने एकूण 185 सामन्यांमध्ये RCB आणि भारताचे नेतृत्व केले आहे. विराट पुन्हा धोनीपर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण त्याने ठरवले आहे की या वर्षानंतर तो भारत आणि RCB या दोघांच्या टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होईल. एलीमिनेटरमध्ये पराभूत झाल्यानंतर विराटचा आरसीबी आधीच बाहेर पडला आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली 9 वा अंतिम सामना

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने यावेळेस 9 वेळा आयपीएल फायनल गाठले आहे. हे सुद्धा स्वतःच एक विक्रम आहे. याशिवाय सीएसकेने तीन वेळा आयपीएल ट्रॉफीही जिंकली आहे. CSK ने प्रथम 2010, 2011 आणि नंतर 2018 मध्ये IPL चे विजेतेपद पटकावले. याशिवाय, 2020 वगळता, हा संघ प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानेही मोठी कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम 2007 टी-20 विश्वचषक आणि नंतर 2011 मध्ये 50 षटकांचा विश्वचषक जिंकला. एवढेच नाही तर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले आहे. धोनीने पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवला.