IPL 2021 : व्हिडीओ आलासमोर, या मुलीला समजतं धोनी कधी कुणाला आऊट करणार आहे?

आयपीएल 2021च्या मॅच सुरु आहे आणि आता प्रत्येक सामन्यात पॅाईंट टेबलवर येण्यासाठी प्रत्येक संघामध्ये चुरस सुरु आहे.

Updated: Apr 22, 2021, 05:02 PM IST
IPL 2021 : व्हिडीओ आलासमोर, या मुलीला समजतं धोनी कधी कुणाला आऊट करणार आहे?

मुंबई : आयपीएल 2021च्या मॅच सुरु आहे आणि आता प्रत्येक सामन्यात पॅाईंट टेबलवर येण्यासाठी प्रत्येक संघामध्ये चुरस सुरु आहे. काल म्हणजेच बुधवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सामऩ्यामध्ये चेन्नईने 18 धावांनी विजय नोंदविला आहे. बुधवारच्या मॅचनंतर पराभव करत चेन्नईचा हा सलग तिसरा विजय आहे. चेन्नईच्या या विजयामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, कर्णधार धोनी कोणताही सामना त्याच्या दिशेने वळवू शकतो. या विषयी सोशल मीडियावर  एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी या सामन्याबाबत अचूक भविष्यवाणी करत आहे.

कर्णधारपदाच्या जोरावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी सामना आपल्या बाजूने करुन घेतो असे बर्‍याचदा पाहिले जाते. यावेळीही असेच काहीसे घडले. खरेतर, केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा हव्या होत्या. स्वत: एमएस धोनीने संपूर्ण फिल्डींग लावली. अशा परिस्थितीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी टीव्हीवर सामना पाहत आहे. सामना पाहत ती मुलगी म्हणाली- "या बॅालवर आपण जिंकणार, हा आता होणार रन आऊट'

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो कोणी हा व्हिडीओ पाहात आहे त्यांना या मुलीचा नेमका अंदाज पाहून आश्चर्य वाटत आहे. ती एखादी ज्योतिषी आहे किंवा कोणी क्रिकेट जाणकार आहे का? असे लोकं विचार करत आहेत. परंतु काही लोकांनी सांगितले की, ती दुसर्‍या अ‍ॅपवर हा सामना पाहत आहेत. तो ऍप काही सेकंद पुढे चालत आहे. लोकं ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर जोरदारपणे शेअर करत आहेत आणि त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने  डुप्लीसे आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अर्धशतकाच्या खेळीच्या बदल्यात तीन विकेट्स देऊन 220 धावांची विशाल नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्स मधून पॅट कमिन्स (नाबाद 66) आणि आंद्रे रसेल (54 ) आणि दिनेश कार्तिकच्या खेळानंतरही ते जिंकू शकले नाही आणि 19.1 ओव्हरमध्ये 202 धावांवर आयपीएलच्या या रोमांचकारी सामन्यात सीएसकेने केकेआरचा 18 धावांनी पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला.