मुंबई: IPLसुरू होण्यासाठी बोटावर मोजण्याइतकेच काही तास शिल्लक राहिले आहेत. 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु रंगणार आहे. यंदाच्या हंगामात सर्वात जास्त विकेट्स घेऊन पर्पल कॅप मिळवण्याची संधी जसप्रीत बुमराहकडे आहे. तर भुवी आणि ब्रावोला टक्कर देण्यासाठी बुमराह सज्ज आहे.
जसप्रीत बुमराह रोहित शर्माच्या टीममधून अर्थातच मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. बुमराहला यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स मिळवण्याची संधी आहेच शिवाय भुवी आणि ब्रावोचा खास रेकॉर्डही तोडण्याची संधी आहे. त्यानिमित्तानं गेल्या 10 वर्षात IPLमध्ये पर्पल कॅप कोणाकोणाला मिळाली आहे हे जाणून घेऊया.
डेक्कन चार्जर्स संघातील प्रज्ञान ओझा याला 2010च्या IPLमध्ये ही कॅप मिळाली होती. त्यानंतर मुंबई इंडियंस संघातील लसिथ मलिंगाने 28 विकेट्स घेऊन ही कॅप 2011 मध्ये आपल्या नावावर केली होती. 2012मध्ये दिल्ली डेयरडेविल्स संघातील मोर्न मोर्कलने आपल्या तुफान गोलंदाजीनं 25 विकेट्स घेऊन पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती.
2013 ते 2015 सलग तीन वर्ष ही कॅप चेन्नई सुपरकिंग्स संघाकडे राहिली आहे. 2013 मध्ये 32 सर्वात जास्त आणि 2015 रोजी 26 विकेट्स घेऊन ड्वेन ब्रावो याने ही कॅप आपल्या नावे केली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघातील भुवनेश्वर कुमारनं सलग दोन वर्ष ही कॅप आपल्या नावे करून घेण्यात यश मिळवलं. 2019मध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्स संघातील गोलंदाज इमरान ताहिर याने ही कॅप मिळवली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघातील रबाडा या गोलंदाजाने 30 विकेट्स घेऊन 2020मध्ये ही कॅप आपल्या नावे केली होती. यंदाच्या IPLमध्ये भुवनेश्वर कुमारसाठी ही संधी असणार आहे. तर सलग दोन वर्ष कॅप आपल्या नावे करण्याचा भुवीचा रेकॉर्ड आहे. भुवी आणि ब्रावो पेक्षा अधिक विकेट्स घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.