IPL 2021: कोलकाता संघातील स्टार फास्ट बॉलरचा सर्व फॉरमॅटमधून संन्यास

कोलकाता संघातील स्टार खेळाडूनं सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. 

Updated: May 15, 2021, 08:14 AM IST
IPL 2021: कोलकाता संघातील स्टार फास्ट बॉलरचा सर्व फॉरमॅटमधून संन्यास title=

मुंबई: कोलकाता संघातील स्टार खेळाडूनं सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातील स्टार फास्ट बॉलर हॅरी गर्नी याने सर्व फॉरमॅटमधून सन्यास घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे IPLचे उर्वरित सामने झाले तर हॅरीची कमतरता संघात जाणावणार आहे. 

हॅरीला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून पूर्णपणे बरा न झाल्यानं त्याला यंदा IPLमध्ये खेळता आलं नाही. खांद्याच्या दुखापतीमुळे 34 वर्षीय हॅरी गर्नीने संन्यास घेतला आहे. त्याने या दुखापतीमधून रिकव्हर होण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा दुखापत होत असल्यानं त्याने अखेर क्रिकेटला बायबाय करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा मी 10 वर्षाच्या होतो तेव्हा पहिल्यांदा बॉल हातात पकडला होता. तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग होता. तेव्हापासून सुरू झालेला आजपर्यंतचा प्रवास खूपच शानदार होता. इंग्लंडसाठी मी आयपीएल, वाइटॅलिटी ब्लास्ट, बिग बॅश आणि सीपीएलसह देश-विदेशातले 8 पुरस्कार जिंकले आहेत. 

खांद्याच्या दुखापतीमधून रिकव्हर होणं म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठा डोंगर चढण्यासारखं आहे. त्यामुळे आता मी सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेत असल्याचं त्यानं जाहीर केलं आहे. 

गर्नीने 2014मध्ये आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून डेब्यू केलं होतं. तो शेवटचं श्रीलंके विरुद्ध इंग्लंड संघाकडून खेळला होता. इंग्लंडसाठी 10 वन डे आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. 2019 रोजी कोलकाता संघाकडून IPLसाठी देखील खेळला होता.