IPL 2021: कोलकाताच्या पराभवानंतर शाहरूख खान नाराज, ट्वीट करत म्हणाला...

मुंबई इंडियन्स संघाने कोलकातावर 10 धावांनी विजय मिळवल्यानंतर शाहरुख खाननं ट्वीट करून नाराजी व्यक्त केली. 

Updated: Apr 14, 2021, 08:09 AM IST
IPL 2021: कोलकाताच्या पराभवानंतर शाहरूख खान नाराज, ट्वीट करत म्हणाला...

मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता अत्यंत चुरशीचा सामना झाला. सूर्यकुमार यादव आणि चाहर यांच्यासह संघाने विजय खेचून आणला. 10 धावांनी मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या दोन ओव्हरमध्ये सामना कोण जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मुंबई इंडियन्स संघानं निसटता विजय खेचून आणला. 

कोलकाता संघाचा पराभव झाल्यानंतर शाहरुख खान नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने लगेच ट्वीट करत चाहत्यांची माफी मागितली आहे. केकरच्या पराभवानंतर शाहरुखने एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त केली. शाहरुखने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, निराशाजनक कामगिरी, थोडक्यात सांगाल, मी कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व चाहत्यांची माफी मागतो. असं ट्वीट त्याने केलं आहे. 

मुंबई इंडियन्स संघाने 10 धावांनी कोलकाता संघावर विजय मिळवला आहे. केकेआर संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. एका क्षण असा होता की आता केकेआर संघ जिंकेल मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पटलटी आणि मुंबई इंडियन्सचा विजय झाला.

शाहरुख खान होम क्वारंटाइन

पठाणच्या सेटवर क्रू मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं सध्या शूटिंगला ब्रेक लागला आहे. तर शाहरुख खाननं स्वत:ला होम क्वारंटाइन केल्याची माहिती मिळाली आहे. 

केकेआर संघाचे पुढील सामने 

रॉयल्स चॅलेंज बंगळुरू विरुद्ध कोलकाता - 18 एप्रिल- दुपारी 3.30 वाजता
कोलकाता विरुद्ध चेन्नई सुपकिंग्स- 21 एप्रिल- संध्याकाळी 7.30 वाजता