IPL 2021: #SaddaPunjab स्वॅग, पंजाब किंग्सकडून नवीन हेलमेट आणि जर्सी लाँच

पंजाब किंग्सनं नव्या जर्सीचा फोटो ट्वीट केला आहे. अखेर प्रतीक्षा संपली असं कॅप्शन देऊन व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे.

Updated: Mar 30, 2021, 04:10 PM IST
IPL 2021: #SaddaPunjab स्वॅग, पंजाब किंग्सकडून नवीन हेलमेट आणि जर्सी लाँच  title=

मुंबई: आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्व संघांनी आता कंबर कसली आहे. तर नुकतीच मुंबई इंडियन्सच्या टीमनं त्यांची जर्सी लाँच केल्यानंतर आता पंजाब किंग्सनंही त्यांचा स्वॅग दाखवला आहे. पंजाब किंग्सने नवीन जर्सी आणि हेलमेट लाँच केलं आहे. 

यावेळी पंजाब किंग्सनं आपल्या जर्सीची डिझाइन दरवेळीपेक्षा थोडी वेगळी केली आहे. पंजाब किंग्सनं नव्या जर्सीचा फोटो ट्वीट केला आहे. अखेर प्रतीक्षा संपली असं कॅप्शन देऊन व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. या जर्सीवर कर्णधार के एल राहुलचं नाव दिसत आहे. 

Reveal kar rahe hain assi, saddi new jersey #SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/zLBoD0d5At

जर्सीच्या डाव्या बाजूला संघाचा नवीन लोगो आणि टीमचं नाव आहे. यावेळच्या जर्सीमध्ये कॉलर आणि खांद्यावर सोनेरी रंगाचा पट्टा देखील देण्यात आला आहे. जुन्या लोगोमध्ये दोन सिंह दिसत होते मात्र नवीन लोगोमध्ये एकच सिंह डरकाळी फोडताना दाखवण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सचे खेळाडू गोल्डन हेल्मेटमध्ये दिसणार आहेत. नव्या जर्सीत पहिल्यांदा 12 एप्रिलला टीम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या वन डे सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार के एल राहुल पुन्हा एकदा चांगल्या फॉममध्ये खेळताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे आता पंजाब किंग्सची सुरुवातही दमदार होणार यात शंकाच नाही असा कयास आहे. 

पंजाब किंग्स टीम
केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभासीमरन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत बरार, ईशान पोरेल, डेव्हिड मालन , जाय रिचर्डसन, शाहरुख खान, राइली मेरीडिथ,मोइजेज हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंह, फॅबियन एलन आणि सौरभ कुमार

Tags: