IPL 2021 RR vs MI : मुंबई इंडियन्स पराभवाची मालिका खंडित करणार?

राजस्थान कसं मोडित काढणार आव्हान, कोण ठरेल मॅचविनर आणि कशी असेल रणनिती? 

Updated: Apr 29, 2021, 11:46 AM IST
IPL 2021 RR vs MI : मुंबई इंडियन्स पराभवाची मालिका खंडित करणार?  title=

मुंबई : पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सचा आज राजस्थान रॉयल्स सोबत सामना होणार आहे. पंजाबसोबत दारूण पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघ नव्या जोमानं पुन्हा मैदानात उतरताना दिसेल. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंची गळती सुरूच आहे. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स दुखापतीमुळे तर एक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोनामुळे IPLमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राजस्थान संघाचा मुंबई इंडियन्स संघासमोर कसा टिकाव लागतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता राजस्थान विरुद्ध मुंबई मुकाबला होणार आहे. दोन्ही संघांना यंदाच्या सीझनमध्ये भरीव कामगिरी करण्यात अपयश आलं. मुंबई पॉईंट टेबलमध्ये चौथ्या तर राजस्थान सातव्या स्थानी आहे. मुंबईला गेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं पराभूत केलं होतं. तर राजस्थाननं कोलकात्यावर विजय मिळवला होता.

मुंबईला आजची मॅच जिंकायची असेल तर कॅप्टन रोहित शर्मा टीममध्ये काही बदल नक्की करेल यात शंका नाही. यंदाच्या स्पर्धेत मीडल ओव्हर्समध्ये सातत्यानं मुंबईचे प्लेअर संघर्ष करताना दिसत आहे. चुकीचे फटके मारुन आऊट होणं मुंबईच्या अंगलट येतं आहे.

क्विंटन डी कॉकला पाहिजे तसा फॉर्म अजून स्पर्धेत सापडला नाही.. ईशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवही मोठी धावसंख्या उभारताना संघर्ष करताना दिसत आहेत.. मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सना पाहिजे तशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला बुमराह, बोल्टसारखे महत्त्वाचे बॉलर्स विकेटसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. 

मुंबई संघाला आपल्या पराभवाची मालिका खंडित करायची असेल तर राजस्थानविरुद्धच्या सामन्यामध्ये आज रोहित शर्माला मुंबईची नव्यानं मोर्चेबांधणी करावी लागेल. तसंच पराभवाची मरगळ झटकून नव्या उमेदीनं मैदानात उतरावं लागणार आहे.

 दुसरीकडे राजस्थाननं गेल्या मॅचमध्ये कोलकाताचा पराभव केला असल्यानं त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल.. जयदेव उनाडकट, ख्रिस मॉरिस, चेतन साक्रिया आणि मुस्तफिजूर रेहमानवर राजस्थानच्या बॉलिंगची जबाबदारी असेल. 

कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर, डेव्हिड मिलरवर बॅटिंगची भिस्त असेल. राजस्थानला मुंबईसारख्या बलाढ्य टीमला पराभूत करायचं असेल तर त्यांना कडवी झुंज द्यावी लागेल. त्यामुळे आजची मॅच जिंकून कोणत्या टीमच्या गळ्यात विजयाची माळ पडेल याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील.