IP 2021 Suspend : माहीचा हा निर्णय ऐकून तुम्हीही कराल महेंद्र सिंह धोनीचं कौतुक

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार असलेल्या धोनी मैदानाच्या बाहेर असो किंवा मैदानात, धोनीने अनेकदा आपल्या पराक्रमासह त्याने घेतलेल्या निर्णयानं किंवा त्याच्या कामगिरीनं चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Updated: May 6, 2021, 12:09 PM IST
IP 2021 Suspend : माहीचा हा निर्णय ऐकून तुम्हीही कराल महेंद्र सिंह धोनीचं कौतुक title=

मुंबई: महेंद्र सिंह धोनी या नावात जादू आहे. ज्याने क्रिकेट विश्वातच नाही तर जगभरात अनेकांची मन जिंकून घेतली आहेत. कधी आपल्या खेळानं तर कधी त्याच्या स्टाइलनं. त्याचे चाहते भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणूनही धोनीचं नाव प्रत्येकाच्या ओठी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पुन्हा एकदा अभिमान वाटावा असं निर्णय धोनीनं घेतला आहे. त्याच्या या निर्णयमुळे त्याचं खूप कौतुक होतं आहे. 

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार असलेल्या धोनी मैदानाच्या बाहेर असो किंवा मैदानात, धोनीने अनेकदा आपल्या पराक्रमासह त्याने घेतलेल्या निर्णयानं किंवा त्याच्या कामगिरीनं चाहत्यांची मने जिंकली आहेत. IPLच्या सामन्यांमध्ये कोरोनाच्या विळख्यात खेळाडू येत असल्यानं मध्येच सामने स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने घेतला. यासोबतच सर्व खेळाडूंना आपापल्या घरी जाण्याच्या सूचना दिल्या. 

याच दरम्यान धोनीने मॅजमेंटला एक विनंती केली. सर्व खेळाडू आपल्या घरी पोहोचल्यानंतर सर्वात शेवटी मी हॉटेलमधून बाहेर पडेन. सर्व खेळाडू घरी सुरक्षितपणे पोहोचणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच मी हॉटेलमधून बाहेर पडेन असंही धोनीनं मॅनेजमेंटला सांगितलं आहे. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार महेंद्र सिंह धोनीने आपली इच्छा व्यक्त केली आहे. सर्वात आधी विदेशी खेळाडू सुखरुप घरी पोहोचावेत. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आपल्याआपल्या घरी जावं. 

इंग्लंडचे 8 खेळाडू सुखरूपपणे आपल्या देशात पोहोचले आहेत. इंग्लंड इयोन मॉर्गन, डेव्हिड मालन आणि ख्रिस जॉर्डन पुढील 24 तासांत भारतातून आपल्या घरी परतण्याची शक्यता आहे.