IPL 2022: के एल राहुलसोबत लखनऊकडून 2 खेळाडूंची निवड, कर्णधारपद मिळणार?

लखनऊ संघाने पहिल्या 3 खेळाडूंची निवड केली आहे. 

Updated: Jan 18, 2022, 06:08 PM IST
IPL 2022:  के एल राहुलसोबत लखनऊकडून 2 खेळाडूंची निवड, कर्णधारपद मिळणार? title=

मुंबई : आयपीएल 2022 आणि मेगा ऑक्शनवर कोरोनाचं सावट आहे. मात्र सर्व काळजी घेऊन आयपीएलचा 15 वा हंगाम खेळवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेची चुरस आणखी वाढणार आहे. याचं कारण 10 संघ आणि 72 सामने होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद अशा दोन संघांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. 

लखनऊ संघाने पहिल्या 3 खेळाडूंची निवड केली आहे. लखनऊ संघ के एल राहुलला घेणार अशा चर्चा होत्याच आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. के एल राहुलने गेल्या हंगामात दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे लखनऊने बाजी मारत त्याला आपल्या फ्रान्चायझीमध्ये घेतलं आहे. 

के एल राहुलसाठी अहमदाबाद आणि आरसीबी संघ देखील या स्पर्धेत होता. मात्र लखनऊ संघाने के एल राहुलला आपल्याकडे घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यासोबत आणखी दोन जणांची नावं समोर आली आहे. 

के एल राहुल लखनऊ संघाचं नेतृत्व करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मार्कस स्टोइनिस आणि रवि बिश्नोई  अशा दोन खेळाडूंना देखील लखनऊ संघाने घेतलं आहे. लखनऊच्या कर्णधारपदाचं नाव लवकरच घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. 

IPL 2022 साठी खेळाडूंचा मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू इथे होण्याची शक्यता आहे. या ऑक्शनवर कोरोनाचं संकट आहे. यंदा दोन संघांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे यंदा अधिक चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.  या नव्या दोन्ही संघांनी आपापल्या तीन खेळाडूंची निवड केली आहे. आता इतर खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.