IPL 2022 | आयपीएलमध्ये ही टीम सर्वात स्ट्रॉंग, दिग्गजाने सांगितलं नाव

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरु आहे. ट्रॉफीसाठी एकूण 10 संघ आमनेसामने आहेत. या मोसमात आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत.

Updated: Apr 11, 2022, 06:12 PM IST
IPL 2022 | आयपीएलमध्ये ही टीम सर्वात स्ट्रॉंग, दिग्गजाने सांगितलं नाव title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरु आहे. ट्रॉफीसाठी एकूण 10 संघ आमनेसामने आहेत. या मोसमात आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी केकेआर आहे. गुजरात (gujtat titans) टीम या मोसमात आतापर्यंत अजिंक्य राहिली आहे.  गुजरातने खेळलेलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. (ipl 2022 gujtat titans is most strongest team in this season says matthew hayden)  

गुजरातच्या या कामगिरीचा इतर संघांनी धसका घेतला आहे. तसेच गुजरातपासून उर्वरित 9 संघांनी सावध रहावं, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा दिग्ग्ज आणि माजी राक्षसी फलंदाज मॅथ्यू हेडनने दिला आहे.

हेडन काय म्हणाला?

हेडन या 15 व्या मोसमात कमेंटेटरच्या भूमिकेत आहे. "गुजरात टीम चांगली कामगिरी करण्यात आघाडीवर आहे. शुबमन गिल सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण मिळवतो. गुजरातचे वेगवान गोलंदाजही जबरदस्त आहेत. गुजरात ही एकमेव अशी टीम आहे, ज्यांना कसं पराभूत याचा विचार प्रतिस्पर्धी संघ करत असतील", असं हेडन म्हणाला.

"गुजरात टायटन्स टीमचा उत्साह आता वाढलेला आहे. तसेच पंजाब किंग्स विरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे टीमच्या विश्वासात वाढ होते", असंही हेडन म्हणाला.

हैदराबाद-गुजरात आमनेसामने

दरम्यान 15 व्या मोसमातील 21 वा सामना आज (11 एप्रिल)  सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हार्दिक पंडयाच्या नेतृत्वात आतापर्यंत गुजरातने सलग 3 सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. 
 
तर दुसऱ्या बाजूला केल विलियमन्सनच्या नेतृत्वात हैदराबादने  3 पैकी केवळ एका सामन्यातच विजय मिळवला आहे.  त्यामुळे हैदराबादसमोर गुजरातचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे.