IPL 2022 | या घातक आणि स्टार गोलंदाजावर ओढावली अशी वेळ

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमापासून लखनऊ आणि गुजरात असे 2 नवे संघ जोडले गेले आहेत. 

Updated: Mar 20, 2022, 04:00 PM IST
IPL 2022 | या घातक आणि स्टार गोलंदाजावर ओढावली अशी वेळ title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमापासून लखनऊ आणि गुजरात असे 2 नवे संघ जोडले गेले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आणखी थरार आणि रंगत पाहायला मिळणार आहे. या गुजरातच्या गोटात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. (ipl 2022 ipl purple cap winner mohit sharma join gujraj titans squad as a net bowler) 

मोहित शर्मा (Mohit Sharma) असं या गोलंदाजाचं नाव आहे. मोहित आयपीएलमध्ये पर्पल कॅप विनर (Purple Cap Winner) राहिला होता. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.

मोहितची गुजरात टीममध्ये एन्ट्री झालीय. मात्र त्यासाठी ही गूड न्यूज म्हणायची की बॅड न्यूज असा सवाल, तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. 

त्याचं झालंय असं की, मोहितचा गुजरात टीममध्ये नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला आहे. दुर्देव म्हणजे मोहित या मेगा ऑक्शनमध्येही अनसोल्ड राहिला. मोहित चेन्नईकडून आयपीएल 2014 मध्ये 16 सामन्यात 23 विकेट्स घेत पर्पल कॅप विनर ठरला होता.