IPL 2022 | रोहित शर्मा मुंबईची कॅप्टन्सी सोडणार?

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामात मुंबईला (Mumbai Indians) एकही सामना जिंकता आलेला नाही.

Updated: Apr 26, 2022, 05:13 PM IST
IPL 2022 | रोहित शर्मा मुंबईची कॅप्टन्सी सोडणार? title=

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली. मात्र आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबईला एकही सामना जिंकता आलेला नाही. मुंबईचा सलग 8 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये अजूनही शेवटून पहिल्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. (ipl 2022 mi mumbai indians rohit sharma might leave captaincy see who step down see who gave up captaincy in mid season)

मुंबईच्या या निराशानजक कामगिरीसाठी कॅप्टन म्हणून रोहित शर्माला (Rohit Sharma) जबाबदार धरलं जात आहे. रोहितला यावेळेस कॅप्टन म्हणून आपली छाप सोडता आली नाही. तसेच रोहित बॅटिंगमध्ये ही फ्लॉप ठरला. त्यामुळे रोहित मुंबईची कॅप्टन्सी सोडण्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

रोहितने मुंबईला 5 वेळा चॅम्पियन केलं म्हणून त्याला टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटमधील कॅप्टन्सी देण्यात आली. यामध्ये रोहितने संधींचं सोनं केलं. टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाच सर्व सामने जिंकले. 

मात्र आयपीएलमध्ये रोहितला सूर गवसला नाहीच. एक, दोन तीन करता करता मुंबईने कधी सलग 8 सामने गमावले, हे समजलं नाही. त्यामुळे आता रोहित मुंबईचं नेतृत्व सोडणार असल्याची चर्चा आहे.