मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये बुधवारी (20 एप्रिल) होणार्या दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्ज (PBKS) सामन्यांपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) संघातील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशा परिस्थितीत आता सामना संध्याकाळी होणार की पुढे ढकलणार हा मोठा प्रश्न आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीत एक विदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या खेळाडूंच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये यापूर्वीच पाच प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर दिल्लीच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली आणि संपूर्ण टीमला क्वारंटाइन करण्यात आले. मिचेल मार्श हा दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू होता जो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यांच्याशिवाय सपोर्ट स्टाफच्या चार सदस्यांना कोरोना झाला होता.
1. पॅट्रिक फरहार्ट (फिजिओ)
2. चेतन कुमार (मसाज थेरपिस्ट)
३. मिचेल मार्श (खेळाडू)
4. अभिजित साळवी (डॉक्टर)
5. आकाश माने (सोशल मीडिया टीम)
जेव्हा दिल्ली कॅपिटल्स कॅम्पमध्ये कोरोनाची प्रकरणे आढळून आली तेव्हा टीमला पुण्याला जाण्यापासून रोखण्यात आले आणि मुंबईतील हॉटेलमध्येच क्वारंटाइन करण्यात आले. या कारणास्तव, बीसीसीआयने 20 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पुण्याऐवजी मुंबईतील सीसीआय स्टेडियमवर आयोजित केला.