मुंबई : गेल्या हंगामात प्ले ऑफपर्यंतही पोहोचू न शकलेल्या राजस्थान संघाने यंदा पुरता धुमाकूळ घातला. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 5 सामने पार पडले.
पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता झाला. या सामन्यात कोलकाता संघ 6 विकेट्सने जिंकला आहे. दुसरा सामना मुंबई विरुद्ध दिल्ली झाला. यामध्ये 4 विकेट्सने दिल्ली टीमने जिंकला आहे.
तिसरा सामना बंगळुरू विरुद्ध पंजाब झाला. या सामन्यात 5 विकेट्सने पंजाब टीमने जिंकला. तर चौथा सामना लखनऊ विरुद्ध गुजरात टीममध्ये झाला होता. यामध्ये गुजरातने 5 विकेट्सने सामना जिंकला.
पंधराव्या हंगामातील पाचवा सामना राजस्थान विरुद्ध हैदराबद झाला. राजस्थान टीमने हा सामना 61 धावांनी जिंकला. आतपर्यंत झालेल्या सामन्यानंतर पॉईंट टेबलवरील आकडे पाहता धोनी आणि कोहलीच्या टीमला तर मोठा धक्का बसला आहे.
गेल्या हंगामात प्लेऑफपर्यंत पोहोचणं कठीण झालेल्या राजस्थाननं आता पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. राजस्थान संघ पहिल्या स्थानावर त्यानंतर दिल्ली आणि तिसऱ्या क्रमांकावर पंजाब संघ आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आज सहाव्या सामना बंगळुरू विरुद्ध कोलकाता टीममध्ये होणार आहे. या सामन्यात जर बंगळुरू जिंकलं तर त्याला थोडा फायदा होऊ शकतो. मात्र कोलकाता संघाने विजय पुन्हा मिळवला तर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या तीनमध्ये कोलकाता संघाला स्थान मिळू शकतं.