मुंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या खेळल्या गेलेल्या सामन्यात ज्या पद्धतीने कर्णधार केन विलियम्सनला आऊट देण्यात आलं त्यावरून आता वाद होताना दिसतायत. केनचे चाहते थर्ड अंपायरने दिलेल्या या निर्णयावर संताप व्यक्त करतायत. त्यामुळे आयपीएल 2022 सुरु होऊन चौथ्याच दिवशी वादाला तोंड फुटलं आहे.
हैदराबाद फलंदाजी करत असताना राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथा बॉल विलियम्सनच्या बॅटला कट लागून विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात गेला. मात्र चेंडू संजूच्या हाती लागला, पण तो पकडू शकला नाही. यावेळी बॉल हवेत उडाला आणि स्लिपला उभ्या असलेल्या देवदत्त पडिकलकडे गेला. संजूकडून चुकलेल्या चेंडू देवदत्तने पकडला.
मात्र यावेळी तो मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायरला कॅच पकडला गेला की बॉल जमिनीला लागला हे समजलं नाही. अंपायरने विलियम्सन आऊट असल्याचा सॉफ्ट सिग्नल दिला. आणि हे तपासण्यासाठी थर्ड अंपायरला विनंती केली. यावेळी थर्ड अंपायरने प्रत्येक अँगलमधून रिप्ले पाहिला आणि विलियम्सनला आऊट दिला. याच मुद्द्यावरू वाद निर्माण झाला.
रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर व्हिडिओच्या पहिल्या फ्रेममधून चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आणि आऊट की नॉट आऊट अशी चर्चा सुरू झाली.
How this is OUT ?
Horrible decision by Umpire K Ananthapadmanabhan.
Another umpiring blunder in #IPL .#IPL2022 #Williamson #SunrisersHyderabad #SRH #SRHvRR #Pune #SanjuSamson pic.twitter.com/5dlxq38fCO— Mr A (@amMrfeed) March 29, 2022
दरम्यान केनची विकेट हैदराबादसाठी खूप महत्त्वाची होती. केन त्याच्या फलंदाजीने कोणत्याही सामन्याचे फासे उलटवू शकतो. त्याला नाबाद घोषित केलं असतं तर सामना बदलू शकला असता. तो बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि अभिषेक वर्माही स्वस्तात माघारी परतले.