'IPL की वधूवर सूचक मेळावा...', तरुणीकडून LIVE मॅचमध्ये RCB फॅनला प्रपोज

मॅच राहिली बाजूला यांचं काय चाललंय?  LIVE मॅचमध्ये RCB फॅन हटके प्रपोज, पाहा व्हिडीओ 

Updated: May 5, 2022, 10:50 AM IST
'IPL की वधूवर सूचक मेळावा...', तरुणीकडून LIVE मॅचमध्ये RCB फॅनला प्रपोज title=

मुंबई : क्रिकेटच्या स्टेडियममध्ये LIVE मॅचमध्ये प्रपोज करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता एका तरुणीनं चक्क लाईव्ह मॅचमध्ये बंगळुरूच्या फॅनला प्रपोज केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयपीएल स्पर्धा आहे की वधूवर सूचक मेळावा तेच समजत नाही. 

आधी हा ट्रेन्ड खेळाडूंनी सुरू केला. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमीही इथे प्रपोज करण्याची संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कपल किस्स करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

आता लाईव्ह मॅचमध्ये चक्क तरुणीनं आपल्या बॉयफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईच्या 11 व्या ओव्हर दरम्यान हा प्रकार घडला. या तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला रिंग घातली आणि आपलं प्रेम व्यक्त केलं. बंगळुरूचा फॅन असलेल्या या तरुणाने तिला जवळ घेऊन मिठी मारली. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. 

महिपाल लोमरोर 27 बॉलमध्ये 42 धावा केल्या. मॅच ऑफ द मॅच हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या. चेन्नई विरुद्ध झालेल्या सामनात बंगळुरू टीमने 13 धावांनी विजय मिळवला.